निवडणुकीआधी गरीब महिला तरुण शेतकरी अन त्यानंतर सुटाबुटातील मित्र 

शेअर करा

शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथे भाजप सरकारवर जोरदार टीका केलेली असून अर्थसंकल्पाविषयी देखील वक्तव्य करत मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा निवडणुकीचा जुमला आहे . निवडणुकीच्या आधीचे संकल्प हे जादूचे असतात असे म्हटलेले आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘ निवडणुकीआधी विकासाची स्वप्न दाखवायची आणि निवडून आल्यानंतर योजनांची सरबत्ती करत फसवणूक करायची . भाजपला आता निवडणुकीच्या वेळी गरीब , महिला , तरुण , शेतकरी या वर्गाला जवळ करायचे आहे आणि विजयी झाल्यानंतर मात्र सूटबुटातील मित्रांना जवळ करायचे हे नागरिकांच्या आता लक्षात येऊ लागलेले आहे. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की , मोदी सरकारने त्यांच्या कारकिर्दीचा शेवटचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जड अंत:करणाने हे कार्य पार पाडले आहे. त्या म्हणाल्या की गरीब ,तरुण ,शेतकरी आणि महिला या चार वर्गासाठी आम्ही काम करणार आहोत. मी अर्थमंत्र्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी किमान निवडणुका आल्यानंतर तरी मोदी यांच्या समोर हे सांगण्याचे धाडस केले. आज दहा वर्षांनी तुम्हाला कळाले की महिला गरीब तरुण शेतकरी हाच खरा देश आहे , ‘ असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हटले आहे . 


शेअर करा