न्यायमूर्तींनी पकडली आरोपीची ‘ तिसरी ‘ लग्नपत्रिका ,  हनिमूनवर केली खोचक टिप्पणी

शेअर करा

एखाद्या व्यक्तीने चक्क न्यायालयाची दिशाभूल करून किती लग्न करावीत ? …… असाच एक प्रकार अजब प्रकार देशात समोर आलेला असून न्यायालयाची दिशाभूल करत स्वतःच्या लग्नाची तिसऱ्यांदा लग्नपत्रिका घेऊन आरोपी कोर्टात आला मात्र त्याची लबाडी न्यायमूर्तींनी रंगेहाथ पकडलेली आहे. 

मध्य प्रदेश उच्च न्यायालयातील हे प्रकरण असून एक व्हिडिओ यासंदर्भात व्हायरल होत आहे . व्हायरल व्हिडिओमध्ये न्यायाधीश वकिलाला विचारतात की , ‘ जो माणूस तुरुंगात आहे तो लग्न करणार आहे का ? उत्तर हो आल्यानंतर न्यायमूर्ती म्हणतात की , ‘ किती हुशार आहे हा मुलगा ?  तुरुंगात शिक्षा भोगत असतानाही त्याचे लग्न जमले. न्यायाधीशांना त्यावर उत्तर देताना वकील सांगतात की त्याचे लग्न यापूर्वी दोनदा ठरले होते. 

न्यायाधीश पुढे म्हणतात की मी, ‘ हा एक वेगळाच कोहिनूर हिरा आहे यापूर्वी दोनदा लग्न ठरले आणि तिसऱ्यांदाही लग्न होणार आहे . आधी शिक्षा भोगा आणि मग लग्न करा ‘ अशा शब्दात न्यायालयाने वकिलाला फटकारले. ‘ लग्नानंतर तुम्ही कशी शिक्षा भोगणार मग तुम्ही म्हणाल की लग्न झाले आहे मला हनिमूनला जायचे ? ‘ अशी देखील न्यायाधीशांनी पुढे खोचक टिप्पणी केली ती देखील सोशल मीडियात व्हायरल झालेली आहे. सदर व्हिडिओ कितपत खरा आहे याविषयी मात्र शंका असून न्यायालयात शूटिंग कशी काढली हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे.


शेअर करा