महाराष्ट्रात ‘ ह्या ‘ शहरातील बारमध्ये महिलांना चक्क ‘ नो शर्ट फ्री बियर ‘ ऑफर : कारवाई होणार का ?

  • by

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा करत अनेक बाबींवर निर्बंध लादले. साहजिकच यामध्ये बियर बार आणि दारूची दुकाने यांचाही समावेश होता. त्यानंतर अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दारूच्या दुकांनावर मद्यप्रेमींची मोठी झुंबड उडाली. अशातच नवी मुंबईतील एका बियर बारने गर्दी खेचण्यासाठी चक्क धक्कादायक प्रकार करत महिलांना ‘ नो शर्ट फ्री बियरची ‘ ऑफर दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारमध्ये विचित्र व अश्लील जाहिराती देण्यात आल्या आहेत. पुरुषांसाठी नो शर्ट नो सर्विस, तर महिलांसाठी नो शर्ट फ्री बियरची ऑफर या बारमध्ये ठेवण्यात आली आहे. यासोबतच अल्कोहोल किल्स कोरोना, असा दावा करणारी जाहिरातही या बारमध्ये करण्यात आलेली असून त्याच्या ह्या ‘ गैर कृत्याची ‘ परिसरात चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

नवी मुंबईतील पाम बीच गॅलेरिया मॉलमधील एजेन्ट् जॅक्स बारमध्ये हा प्रकार होत असल्याचं समोर आलं आहे. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला . बारमध्ये अश्लील जाहिरात देणाऱ्या संबंधितांवर कारवाई होणार का हे येत्या काळात पाहावं लागेल.