एनसीईआरटीची पुस्तकेही बनावट ?, चुकीच्या माहितीबद्दल एनसीईआरटीचा इशारा

शेअर करा

पूर्वीच्या काळी पुस्तकांची काही ठराविक दुकाने असायची आणि त्यामधून पुस्तके विकली जायची मात्र त्यानंतर काळ बदलला आणि पुस्तकांची ऑनलाइन विक्री देखील सुरू झाली . ऑनलाइन विक्रीवर बहुतांश प्रमाणात अंकुश नसल्याकारणाने पायरेटेड पुस्तके देखील विकली जात असल्याची शक्यता असून पायरेटेड पुस्तकात चुकीची माहिती असण्याची शक्यता आहे असा इशारा एनसीईआरटी संस्थेने दिलेला आहे

एनसीईआरटीने यासंदर्भात एक निवेदन दिलेले असून त्यामध्ये , ‘ काहीजण एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांच्या बनावट प्रतींची छपाई करून त्यांची विक्री करत आहेत त्यामुळे कॉपीराईट कायद्याचा तर भंग होतच आहे उलट त्यामध्ये चुकीची माहिती देखील असण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा स्वरूपाची पुस्तके विकत घेऊ नये ‘ असे आवाहन करण्यात आलेले आहे. 

काही प्रकाशकांनी एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांची अवैधरित्या छपाई केलेली असून ही पुस्तके त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेली आहेत असे गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाईचा देखील इशारा देखील संस्थेने दिलेला असून त्याहीपेक्षा चुकीची माहिती पसरवण्याच्या उद्देशानेच असे प्रकार केले जात असल्याचा देखील संशय निर्माण झालेला आहे. 

व्हाट्सअपवरील  फॉरवर्ड केलेल्या माहितीवर विश्वास ठेवल्याने नागरिकांच्या अज्ञानात मोठ्या प्रमाणात भर पडत आहे . व्हाट्सअपवरील माहिती ही केवळ एका राजकीय उद्देशाने नागरिकांच्या मोबाईलवर फॉरवर्ड करण्यात येते आणि त्यातून अनेक भक्त जन्माला आलेले आहेत. एनसीईआरटीच्या पुस्तकांच्याही बनावट प्रति छापून त्या खऱ्या असल्याचे भासवत जर विक्री होत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे.  अर्धवट ज्ञान अज्ञानी असल्यापेक्षाही घातक असते त्यामुळे या प्रकारांवर कठोरात कठोर कारवाईची नितांत गरज आहे. 


शेअर करा