नगर शहरात एमआयडीसीजवळ खून , लामखेडे पेट्रोल पंपाजवळ सापडला मृतदेह : काय आहे बातमी ?

शेअर करा

नगर शहरात एमआयडीसीजवळ लामखेडे पेट्रोल पंपाजवळ एका चालकाच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. रामदास बन्सी पंडित ( वय 45 राहणार निंबळक तालुका नगर ) असे खून झालेल्याचे नाव असून व्यवसायाने ते चालक असल्याचे समजते. त्यांचा खुन कुठल्या कारणावरून झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रामदास पंडित हे केडगाव येथे चालक म्हणून कामाला होते. बुधवारी रात्री त्यांनी केडगाव येथून घरी येत असल्याची माहिती फोन करून कुटुंबीयांना दिली होती. कुटुंब वाट पाहत असतानाच रामदास घरी आलेच नाहीत आणि त्यांचा फोन देखील बंद येत होता. त्यानंतर घरच्यांना शंका आणि आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली.

गुरुवारी सकाळी रामदास यांचा मृतदेह बायपासवर निंबळक शिवारात लामखेडे पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. सकाळी माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील तसेच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे .


शेअर करा