गुजरातमध्ये देखील लागल्या लांब लांब रांगा मात्र दारूसाठी नव्हे तर चक्क … ?

शेअर करा

देशात कोरोना ग्रस्तांचा आकडा १ लाख १२ हजारांच्या पुढे पोहचला असून कोरोना आटोक्यात येण्याच्या आशा देखील कमी आहेत. लॉकडाऊन ३ मध्ये केंद्राने काही शिथिलता आणून दारुची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. त्यावेळी अनेक दारुच्या दुकानाबाहेर रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. इतकचं काय तर काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्जही केला, मात्र गुजरातमध्ये चक्क तंबाखू खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र होते . एएनआय ह्या वृत्तसंस्थेने अशी बातमी दिली आहे .

दिनेश हा असाच एक रांगेत उभा राहून तंबाखू घेणारा ग्राहक आहे. तंबाखूच्या खरेदीसाठी लांब रांगेत उभा असणारा दिनेश म्हणतो, कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन झाला होता त्यामुळे मला आणि माझ्या वडिलांना कुठेही तंबाखू मिळू शकली नाही. पण आता दुकाने उघडल्यापासून मी जिवंत आहे असं मला वाटत आहे. तंबाखू खरेदी करण्यासाठी मी एक तासासाठी लाइनमध्ये उभा आहे.

सूरतमध्ये निलेशचे तंबाखूचे दुकान आहे. लॉकडाऊनमध्ये तंबाखूच्या विक्रीवर सूट दिल्यानंतर ते म्हणाले, दुकान बंद झाल्यामुळे ग्राहकांना मोठी अडचण होईल असं मला वाटते. मला वारंवार फोन येत असतं म्हणून मी मोबाईलही बंद केला होता. काही लोकांना माझ्या घराचा पत्ता मिळाला तेव्हा ते तंबाखूसाठी माझ्या घरी आले होते असं त्याने सांगितले.


शेअर करा

Leave a Reply