वहिनीला परपुरुषाबरोबर रंगेहाथ पकडलं, नंतर दिरानं जे काही केलं त्यानं सगळेच हादरले

शेअर करा

विवाहबाह्य संबंधात एक धक्कादायक घटना बिहार इथे उघडकीस आली असून दिराने केलेल्या कारनाम्यामुळे त्याच्या वहिनीच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. बिहारमधील नवादा इथे ही घटना घडलेली आहे. दिरानं आपल्या वहिनीला परपुरुषाबरोबर एका रुममध्ये रंगेहाथ पकडले आहे.आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झालेय आणि तिला एक मूलही आहे.

सदर महिलेचा पती हा उच्चशिक्षित असून एका चांगल्या कंपनीत कामाला आहे. तिचा प्रियकर प्रमोद चौधरी देखील विवाहित आहे आणि त्यालासुद्धा दोनं मुलं आहेत. या महिलेचा नवरा बंगळुरूमध्ये काम करतो, अशीही माहिती मिळतेय. पती दूर राहत असल्यामुळे तिच्यावर घरात कोणाचा धाक नव्हता त्यातूनच हा सर्व प्रकार घडल्याचे समजते.

दोघांनी वर्ष 2018 मध्ये लग्न केले होते, पतीच्या मागे ती महिला आपल्या प्रियकराबरोबर बोलत असायची. घराबाहेर पती नसताना याचा फायदा घेत या महिलेने आपल्या प्रियकराला तिच्या सासरी बोलावून घेतले. एखाद्याने पाहिले तर काय होईल, याची भीती तिला अजिबात नव्हती. प्रियकरही तिच्या घरी पोहोचला आणि त्यानं कोणताही संकोच न करता रात्री तिच्या सोबत थांबण्याचा निर्णय घेतला.

सकाळी तिच्या दिरानं वहिनीच्या खोलीकडे पाहिलं तर त्याला वहिनी परपुरुषाबरोबर झोपलेली दिसली. त्याने ताबडतोब खोलीचा दरवाजा बंद केला, जेणेकरून तो पळून जाऊ नये आणि दिरानं त्वरित कुटुंब आणि आसपासच्या लोकांना एकत्र केले. पोलिसांना बोलवून तातडीने जिल्हा परिषद सदस्याला याबाबत सांगितले. त्यांनी पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेच्या प्रियकराला अटक केली. ही महिला सिरडाळा येथील चौबे गावची रहिवासी आहे. तिचे तीन वर्षांपूर्वी पतंगी गावात लग्न झाले होते. तिचा नवरा कामासाठी शहरात राहतो. आपला पती घरात नसल्याचा फायदा घेत या महिलेने रविवारी रात्री तिचा प्रियकर प्रमोद चौधरीला फोन केला. सकाळी अचानक त्या महिलेच्या दिरानं तिला दुसर्‍या पुरुषाबरोबर पाहिले. हे पाहून तो खूपच खजिल झाला. त्याने ताबडतोब तेथे असलेल्या सर्वांना बोलावून वहिनीचा भांडाफोड केला.


शेअर करा