कौतुकास्पद..मोलकरीण शब्दालाच या श्रीमंत देशाने घातली बंदी; हे आहे कारण

शेअर करा

आखाती देशांत अनेक श्रीमंत देशांपैकी एक म्हणजे सौदी अरेबिया. या देशाला खनिज तेलांच्या विक्रीतून प्रचंड मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं त्यामुळे तो देश जगातील श्रीमंत देशांपैकी एकही समजला जातो.

सौदी अरेबियाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या सरकारनी वेळोवेळी घेतलेले निर्णय. काही वर्षांपूर्वीपर्यंत सौदी अरेबियातील महिलांवर प्रचंड बंधनं होती. त्यांना सार्वजनिक आयुष्यात ही बंधनं पाळवीच लागत. आता इथलं सरकार या नियमांत शिथिलता आणत असून महिलांना कार चालवायला परवानगी देण्यात आली आहे. आणखीही काही चांगले निर्णय या सरकारने घेतले आहेत.

परदेशातून घरकामारांना सौदी अरेबियात बोलवताना देण्यात येणाऱ्या जाहिरातींमध्ये या कामगारांचा उल्लेख इंग्रजीतील मेड असा करू नये. त्यामुळे या परदेशी घरकामगारांच्या सन्मानाला धक्का पोहोचतो त्यामुळे जाहिरातींमध्ये असे उल्लेख टाळावते असं वाणिज्य मंत्रालयाने (The Ministry of Commerce) आपल्या आदेशात म्हटलं आहे. सौदी गॅझेटच्या वेबसाइटवर ही बातमी प्रसिद्ध झाली आहे.

कोणत्याही जाहिरातीमध्ये एखाद्या व्यक्तीचा फोटो, ओळखपत्र, राहण्याचं परमीट किंवा त्या कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करू नये. कर्मचारी, घरगुती कर्मचारी आणि याच गटातील सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांसंबंधी जाहिरातींसाठी हे नवे नियम लागू असतील, असेही यात स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोणत्याही कर्मचाऱ्याने दिलेल्या सेवेच्या बदल्यात त्याला कोणत्याही प्रकारचा आर्थिक उचलावा लागेल अशी तरतूद कोणत्याही जाहिरातीमध्ये कोणत्याही परिस्थितीत असता कामा नये. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवेच्या बदल्यात कोणत्याही रकमेच्या बिलाची मागणी त्या कर्मचाऱ्याकडे नोकरी देणाऱ्याने करू नये असंही मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. कर्मचाऱ्याने सेवा द्यायला सुरू करण्यापूर्वी त्याची यासाठी परवानगी असायला हवी असंही या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.


शेअर करा