मी मातोश्रीत बसतो, तुम्ही तुमच्या घरी बसा, मग खायच काय? – नारायण राणे 

शेअर करा

“मुख्यमंत्री लॉक डाऊन करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे दोन मित्र पक्ष एवढे उतावळे झालेले नाहीत. माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे  धोरण त्यांना पेलवलं नाही. म्हणून कोविड रुग्ण वाढले. इतर राज्यात कोविडचे रुग्ण कमी झाले. मग महाराष्ट्रात कसे वाढले?” असा सवाला भाजपाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी विचारला आहे.

नारायण राणे यांनी लॉकडाउनच्या निर्णयाला विरोध केला आहे. आता सर्वबाजुंनी लॉकडाउनला विरोध सुरु झाला आहे. आता उठाव झाल्यानंतर घाबरले, असे नारायण राणे म्हणाले. “शिस्तपाळा नाही, तर लोकडाऊन करू अशी धमकी  देतात. आपण काय बोलतोय, याचा विचार करा, नागरिकांना मान, सन्मान देऊन बोललं पाहिजे” असं राणे म्हणाले. 

मी मातोश्रीत बसतो, तुम्ही तुमच्या घरी बसा, मग खायच काय?. दोन वेळेचं जेवणाच पॅकेट मुख्यमंत्री प्रत्येकाच्या घरी देणार आहेत का? म्हणून लॉकडाऊनला आमचा विरोध आहे, असे राणे म्हणाले. 

“सर्व उद्योग कोलमडलेत. अधिकाऱ्यांचं काम फक्त मंत्र्यांना कमवून देण्याचं उरलं आहे. सचिन वाझे एपीआय होता. त्याच्या गाड्या किती? ऑबेरायमध्ये वाझे याच्या सोबत एका बाईचा व्होडिओ आहे. कोण ही बाई काय करायची? दिशा सालियन, पूजा चव्हाण, मनसुख हिरेन अशा किती हत्या झाल्या? कोणीतरी गॉड फादर असल्याशिवाय असणार आहे का हे? असा सवाल राणेंनी विचारला. 


शेअर करा