बायकोचा प्रियकर अखेर तिच्यासोबत रंगेहाथ सापडताच ‘ ह्या ‘ व्यक्तीने जे केले ? : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

लॉकडाऊन नंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक होत असताना काही विवाहबाह्य प्रकरणे देखील अनलॉक होत आहेत. मात्र अशी प्रकरणे अनलॉक होत असताना बहुतांश वेळा विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पत्नीकडून पतीला व प्रेयसीला मारहाण होते मात्र नगर जिल्ह्यात चक्क पतीने पत्नी व प्रियकर यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचे प्रकरण समोर आले आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथे ही घटना घडली आहे.

अरुण सानप (रा.चकला, ता.शिरुर कासार, जि. बीड) असे या प्रियकराचे नाव असून तो श्रीगोंदा शहरातील एका खासगी रुग्णालयात रविवारी (दि.२१ जून) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. विशेष म्हणजे त्याची प्रेयसी ही विवाहित असून ह्या महिलेच्या पतीने त्याला वारंवार आपल्या बायकोपासून दूर सांगितले होते तसेच पत्नीला देखील त्याच्यापासून दूर राहण्याची ताकीद दिली होती.मात्र त्यांच्यात बदल झाला नाही .

श्रीगोंदा फॅक्टरीवरील विवाहित महिला श्रीगोंदा शहरातील एका हॉस्पीटलमध्ये परिचारिका म्हणून काम करते. तिथेच तिचे बीड जिल्ह्यातील अरुण सानप याच्याशी सूत जुळले. त्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या मात्र दरम्यान ह्या महिलेच्या पतीला ह्या प्रकाराची कुणकुण लागली . कित्येकदा सांगून देखील बायकोत आणि तिच्या प्रियकराच्या वर्तणुकीत बदल होत नसल्याचे पाहून त्याने योग्य वेळेची वाट पाहिली आणि दोघांना रंगेहाथ धरले आणि शेवटी रविवारी श्रीगोंद्यातील हॉस्पीटलमध्ये जाऊन चांगलाच राडा केला आणि प्रियकरावर चाकूने हल्ला केला .

प्रेयसीच्या पतीने केलेल्या चाकूहल्ल्यात हल्ल्यात अरुण सानप हा जखमी झाला असून त्याने प्रेयसीच्या पतीविरुद्ध श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे .


शेअर करा