‘ मी काय ऑक्सिजन घरी बनवितो का ? ‘ डॉक्टरच्या उद्धट उत्तरानंतर पुढे जे घडले…

शेअर करा

सध्याच्या स्थितीत मोठ्या संख्येनं लोकांना कोरोनाचं संक्रमण होत असल्यामुळे वैद्यकीय व्यवस्थेवर ताण आला आहे. अशा स्थितीत डॉक्टर, इतर वैद्यकिय कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यातील वाद विकोपाला जात आहे. अशीच एक खळबळजनक घटना सोशल मीडियावर समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील कन्नौज जिल्ह्यातील राजकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक मुलगा आईचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात  डॉक्टरांकडून ऑक्सिजनची भीक मागत होता मात्र अखेर त्यालाच डॉक्टर कडून मारहाण करण्यात आली आणि ऑक्सिजनअभावी आईचा मृत्यू झाला.

ऑक्सिजन न मिळाल्याने आपल्या मुलासमोर आईचा मृत्यू झाला. आपल्या आईच्या मृत्यूमुळे त्रस्त असलेल्या मुलाला तिथे उपस्थित एका डॉक्टरने त्याला मारहाण केली. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिस घटनास्थळी हजर होते पण कोणत्याही पोलिसाने डॉक्टरला मारहाण करण्यापासून रोखले नाही.

एका खासगी वृत्तपत्रातील पत्रकाराच्या सासूला आजारामुळे त्याला वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयात बेड नसल्यामुळे पीडिताने महिलेवर जमिनीवर उपचार सुरु केले. दरम्यान, महिलेला अचानक ऑक्सिजनची आवश्यकता भासली. पण तिला रुग्णालयात ऑक्सिजन मिळाला नाही. मृत महिलेचा मुलगा ऑक्सिजनची भीक मागत होता परंतु ऑक्सिजनऐवजी त्याला मारहाण करण्यात आली.

पीडित राहुल पालने सांगितले की, ” आईला श्वास घेण्यास त्रास होत होता. म्हणून रुग्णवाहिकेतून वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. परंतु तेथे डॉक्टरांनी बेड पुरवला नाही. ‘मी काय ऑक्सिजन बनवितो,  जे करायचे आहे ते करा’ असे उपस्थित डॉक्टरांचे म्हणणे होते.”  ऑक्सिजनच्या अभावामुळे आईचा मृत्यू झाला. आता मृतकाचा मुलगा राहुल यांनी रुग्णालयातील कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


शेअर करा