रात्री प्रियकराला धो धो धुतले तर सकाळ होताच ‘ जावईबापू ‘ , कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

कोरोना काळात रुग्णांच्या नंतर सर्वाधिक हाल कुणाचे झाले असतील तर ते प्रेमी युगुलांचे . सर्वजण घरीच असल्याने मनमोकळ्या गप्पा मारता येत नाहीत ही गोष्ट वेगळीच मात्र उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एक विचित्र घटना घडली. मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या प्रियकराला तरुणीच्या घरातल्यांनी पकडलं. त्यानंतर या तरुणाला एका खोलीत बंद करून धुलाई केली. पोलिसांनी आपापसात हे प्रकरण मिटवण्यास सांगितले. त्यानंतर एकमेकांशी चर्चा करून, रात्रभर मारहाण केलेल्या या तरुणाला दुसऱ्याच दिवशी कुटुंबियांनी जावई करून घेतलं.

रामपूर येथील एका गावात राहणाऱ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तरुण तिच्या घरी गेला. दोघं बऱ्याच वर्षांपासून एकमेकांसोबत होते. रात्री 12 वाजता तरुणाला कुटुंबियांनी पाहिले. त्यानंतर गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी आलेल्या या तरुणाला मुलीच्या कुटुंबियांनी मारहाण केली. तरुणाला एक खोलीत बंद करण्यात आले. घरातून विचित्र आवाज येऊ लागल्यामुळे शेजाऱ्यांनीही गर्दी केली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या प्रेमप्रकाराचा पर्दाफाश झाला .

यासंदर्भात अप्पर पोलिस अधीक्षक अरुण कुमार सिंह म्हणाले की, या प्रकरणाची तक्रार येताच मुलाला पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. मुलाच्या कुटुंबातील लोकही आले. ते म्हणाले की, दोन्ही कुटुंबांना आपापसात हे प्रकरण मिटवण्यास सांगितले. यानंतर, मुला-मुलीच्या कुटुंबियांनी या दोघांचे लग्न ठरवले आणि त्याचदिवशी एका छोट्या मंदिरात त्यांचा विवाह झाला. झालं गेलं गोड मानून पोलिसही या अनोख्या सोहळ्यात सहभागी झाले होते.


शेअर करा