आता बोला..निलेश लंकेच्या कामाचे भाजप आमदाराकडून कौतुक

शेअर करा

पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड सेंटर उभारुन कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांनी नुकतीच या कोव्हिड सेंटरला भेट दिली. यावेळी महाले यांनी लंकेंचं काम राज्यात आदर्शवत असल्याचं सांगत कौतुक केलं. भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या आमदाराचं कौतुक केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे तर दुसरीकडे भाजप आमदारानेच राष्ट्रवादीच्या आमदाराचे कौतूक केल्याने भाजपच्या गोटात देखील खळबळ उडाली आहे .

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे कोव्हिड सेंटर उभारले आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांनी त्याला भेट दिली. “आमदार निलेश लंके हे विधानसभेतील आमचा चांगले सहकारी आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव नसतानाही ते गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात राज्यात आदर्श काम करत आहेत” अशा शब्दात श्वेता महाले यांनी निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक केलं. विरोधीपक्ष भाजपच्या आमदार असताना सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदाराचं कौतुक महालेंनी केल्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे.

श्वेता महाले पाटील या बुलडाण्यातील चिखली विधानसभेच्या आमदार आहेत. भाजपच्या तिकीटावर त्या निवडून आल्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांचा पराभव केला. त्यांना भाजपने 2019 मध्ये विधानसभेचं तिकीट दिलं होतं त्यानंतर श्वेता महाले मिळालेल्या संधीचं सोने करुन विधानसभेत पोहोचल्या होत्या .

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी खिशात एक रुपयाही नसताना, कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना तब्बल 1100 बेडचे कोविड सेंटर उभारण्याची किमया केलीये. सर्वसामान्य कुटूंबात जन्म घेतलेले निलेश लंके हे लोकवर्गणीतून आमदार झाले. त्यांच्यात लहानपणापासूनच समाजसेवेची आवड, इतरांना नेहमी मदत करण्याची वृत्ती आहे. हे सर्व काम करत असताना ते ग्रामपंचायतमध्ये सरपंच झाले आणि थेट आमदारकीपर्यंत त्यांनी मजल मारली होती मात्र निवडून आल्यावर देखील लंके यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची महाराष्ट्रात मोठी चर्चा आहे .

निलेश लंकेचा साधेपणा हाच ठरतोय लंके ब्रँड

कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे राज्यात सध्या हाहा:कार उडाला आहे. राज्यात हजारो रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बेड्स, औषधी कमी पडत असताना अनेकजण मदतीसाठी सरसावत आहेत. अनेकजण सढळ हाताने सरकारला मदत करत आहेत. नगर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी निलेश लंके हे सर्वात जास्त अग्रेसर राहिलेले आहेत . 1 हजार बेडचं कोविड सेंटर दोन ठिकाणी उभारल्यानंतर आता लंके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता .

कोरोनाग्रस्तांना योग्य उपचार मिळावेत म्हणून निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने तब्बल 1 हजार बेड्सचे कोविड सेंटर दोन ठिकाणी उभारले. निलेश लंके यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या सेंटरमध्ये जेवणाची तसेच उपचाराची सोय आहे. याच कोविड सेंटरमुळे लंके यांची संपूर्ण महाराष्ट्रमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. कोरोना रुग्णांची पूर्णपणे काळजी घेता यावी म्हणून त्यांनी कोविड सेंटरमध्येच मुक्काम ठोकला आहे. तसा फोटो राष्ट्रवादी काँग्रेस अपेटड्स या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला होता .

या फोटोमध्ये निलेश लंके आमदारकीचा कोणताही बडेजाव न मिवरता गरीब आणि सामान्य लोकांमध्ये झोपल्याचे दिसत आहेत. अंगवार काहीही नसताना ते शांतपणे झोप घेताना दिसतायत. त्यांच्या आजूबाजूला नागरिक आराम करत आहेत. लंके यांच्या आजूबाजूला झोपलेले कोरोनाग्रस्त आहेत की नेमके कोण हे सांगणे कठीण असले तरी ते कोविड सेंटरच्या परिसरात झोपलेले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. त्यांचा हाच फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लंके यांनी उभ्या केलेल्या कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी पौष्टिक नाश्ता आणि जेवणासोबतच करमणुकीच्या साधनांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्या या कामाची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली होती.


शेअर करा