खळबळजनक..विवाहित नर्सचा ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

शेअर करा

विवाहित नर्सने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये समोर आली आहे. झाडाला ओढणीने गळफास घेऊन तिने आपल्या आयुष्याची अखेर केली. विवाहित प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी प्रियकराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

बीड तालुक्यातील मांजरसुंबा घाटात पालीजवळ सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मांजरसुंबा घाटातील एका झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आणि त्यानंतर सदर महिलेचे नाव सोनाली जाधव असे असल्याचे स्पष्ट झाले .

सोनाली बीडमधील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी करत असल्याची माहिती आहे. प्रेम संबंधातून तिने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. सोनालीचा प्रियकर अक्षय आव्हाड हा देखील विवाहित होता मात्र त्याने लग्नास नकार दिल्याने सोनाली जाधवने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


शेअर करा