महाराष्ट्र हादरला..विवाहित प्रेयसी प्रियकरासोबत घरात असताना दाराच्या फटीतून पाहिले ‘ असे ‘ दृश्य की ..

शेअर करा

दोघेही अन्यत्र विवाहित असताना त्यांचे इतरत्र प्रेम जुळुन आले मात्र यानंतर पुढे आयुष्यात आपण कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत, या नैराश्याने या विवाहबाह्य संबंधातून त्या प्रेमीयुगुलाने एकाच साडीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात हरसुल परिसरात एकता नगर येथे मंगळवारी उघडकीस आली आहे . प्रेयसीच्या मागे तीन मुले व पतीसह कुटुंबीय देखील आहेत तर प्रियकराच्या मागे त्याची पत्नी व कुटुंबआहे. हरसुल पोलीस ठाण्यात या प्रकाराची नोंद करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सीमा ईश्वर कांबळे ( वय 35 ) सचिन गंगाधर पेटारे ( वय 27 ) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. सीमा व सचिन हे जवळच्याच वसाहतीत राहत असल्याने त्यांची ओळख झाली. या ओळखीतून पुढे भेटीगाठी झाल्यानंतर त्यांच्या प्रेम निर्माण झाले. सचिनचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते तर सीमाला बारा व सहा वर्षाच्या मुली व एक वर्षाचा मुलगा आहे.

मंगळवारी सकाळी सीमाचा पती कामावर गेल्यावर सचिन सीमाच्या घरी गेला तेव्हा सचिन तिथे गेल्यावर हे तिघेही खेळण्यासाठी बाहेर गेले. सीमा व सचिन यांनी खोलीचे दार आतून बंद करून घेतले आणि साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सीमाची मुले घरी परतली तेव्हा त्यांना घराचे दार आतून बंद दिसले. दार उघडत नसल्याने त्यांनी घर मालक आणि शेजार्‍यांना ही बाब सांगितली.

घरमालकाने दाराच्या फटीतून आत डोकावले असता सीमा आणि सचिन गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत त्याला आढळून आले. त्यांनी तात्काळ सीमाचा पती तसेच हर्सूल पोलिसांना फोन करून तिथे बोलून घेतले आणि दार तोडले असता दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घरमालकाने आत डोकावून पाहिले असता आतील धक्कादायक प्रकार पाहून त्यांनी मुलांना दुसरीकडे नेले मात्र काहीतरी अघटित घडले आहे हे मुलांना समजताच त्यांनी हंबरडा फोडला होता. या दुर्दैवी प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


शेअर करा