महिला कॉन्स्टेबल चक्क डीएसपीसोबत स्विमिंग टॅंक मध्ये ‘ आऊट ऑफ कंट्रोल ‘

शेअर करा

महिला कॉन्स्टेबलसोबत स्विमिंग पूलमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या राजस्थानच्या डीएसपीला उदयपूरमधील एका रिसॉर्टमधून अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रूपनं रिसॉर्टवर छापा टाकला त्यावेळी डीएसपी आणि महिला कॉन्स्टेबल एका रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये अश्लील चाळे करताना आढळून आले होते, त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आधी डीपीसींना अटक करण्यात आली आणि त्यानंतर निलंबीत देखील करण्यात आले आहे.

महिला कॉन्स्टेबलसोबत तिचा लहान मुलगा देखील असल्याने संबंधित महिला कॉन्स्टेबलला अटक करण्यात आलेली नाही. अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात लीक झाल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. पोलीस खात्याची अशा कारनाम्यामुळे बदनामी होत असल्याने तात्काळ कारवाई करत पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा रिसॉर्टवर छापा टाकून उदयपूर येथून डीएसपी हीरालाल यांना अटक करण्यात आली आहे.

स्पेशल ऑपरेशन ग्रूपचे एडीजी अशोक राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ शूट कुणी केला आणि कुणी व्हायरल केला याचाही शोध घेतला जात आहे. व्हिडिओमध्ये लहान मुल देखील दिसत असल्यानं राज्य बाल संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा संगीता बेनिवाल यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नागौर पोलीस अधिक्षकांना या प्रकरणाचा तीन दिवसांत अहवाल देण्याचा आदेश संगीता बेनिवाल यांनी दिला आहे.

सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलचा पती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचला होता. पण डीएसपीच्या दबावामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला गेल्याचा आरोप पतीनं केला आहे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनाही निलंबीत करण्यात आलं आहे तर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या डीसीपींवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हिरालाल सैनी यांनी मात्र हा व्हिडीओ फेक असून एडीट करुन बनवल्याचा दावा केलाय. एवढच नाही तर व्हिडीओत दिसत असणारी महिला कोण आहे हे मी ओळखत नसल्याचही त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे महिला कॉन्सटेबलनेही हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलंय मात्र संबंधीत महिला कॉन्सटेबलनं 13 जुलै 2021 ला स्विमिंग पूलमधलेच काही फोटो आणि व्हिडीओ व्हॉटस अप स्टेटस म्हणून ठेवले होते, अशीही माहिती समोर आली आहे.


शेअर करा