अन काँग्रेस भिडली ..नथुराम गोडसेच्या पुतळ्यावर काँग्रेसकडून हातोडा

शेअर करा

भाजप सत्तेत आल्यानंतर नथुराम गोडसे या व्यक्तीचे उदात्तीकरण सुरु झाले आहे . विशेषतः भाजप शासित राज्यात असे प्रकार उघडकीस येत असून हिंदू सेनेने जामनगरमध्ये बसवलेल्या नथुराम गोडसेच्या पुतळ्याची जामनगर काँग्रेसचे अध्यक्ष दिगुभा जडेजा आणि त्यांच्या साथीदारांनी मंगळवारी सकाळी तोडफोड केली. मंगळवारी सकाळी काँग्रेस नेते पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचले आणि दगडाने फोडून हा पुतळा पाडला.

जामनगर येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी पुतळा उभारण्यास जागा देण्यास नकार दिल्यावर देखील हा पुतळा हनुमान आश्रमात उभारला होता. मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या पुतळ्याची तोडफोड केली. दुसरीकडे हिंदू महासभेने हरियाणाच्या अंबाला सेंट्रल जेलमधून आणलेल्या मातीपासून नथुराम गोडसेचा पुतळा बनवणार असल्याची देखील वल्गना केली आहे. महात्मा गांधी यांची हत्या केली म्हणून नथुराम गोडसे याला १९४९ मध्ये फाशी देण्यात आली होती.


शेअर करा