नगर ब्रेकिंग..समाजवादी पार्टीचे नगरसेवक आसिफ सुलतान काँग्रेसमध्ये दाखल , म्हणाले की.. ?

शेअर करा

नगर शहरातील फकिरवाडा मुकुंदनगर भागातील समाजवादी पार्टीचे विद्यमान नगरसेवक आसिफ सुलतान यांनी संगमनेर येथे दाखल होत साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांच्यासह इतरही अनेक काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

काँग्रेस प्रवेशानंतर आसिफ सुलतान म्हणाले की, ‘ आज देशातील परिस्थिती पाहिली तर देशाला काँग्रेस पक्ष आणि त्यांची विचारधारा हीच एकसंध ठेऊ शकते . नगर शहरामध्ये राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला तर आज सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढणाऱ्या निर्भीड नेतृत्वाची गरज आहे. किरण काळे यांच्या नेतृत्वामध्ये कॉंग्रेस नगर शहरामध्ये भक्कमपणे उभी राहिलेली आहे. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख नेतृत्वाकडे आकर्षित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला असून आगामी काळात अल्पसंख्यांक भागातून काँग्रेस पक्षासाठी मोठे संघटन उभे करणार आहे. ‘

किरण काळे यावेळी बोलताना म्हणाले की, ‘ असिफ सुलतान यांना काँग्रेसच्या माध्यमातून म्हणून सर्वतोपरी ताकद देण्याचे काम केले जाईल. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना बळ दिले जाईल. त्यांच्यावर महत्वपूर्ण संघटनात्मक जबाबदारी देखील सोपवली जाणार असून काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी ते निश्चितच चांगले योगदान देतील ‘, असेही म्हटलेले आहे.


शेअर करा