केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडूनही करात कपात , पेट्रोल डिझेल झाले ‘ इतके ‘ स्वस्त

शेअर करा

महागाईने होरपळलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने अबकारी कर कमी करून काही प्रमाणात दिलासा दिल्यानंतर राज्यसरकारने देखील करात व्हॅटमध्ये दिलासा दिलेला असून त्यामुळे पेट्रोल दोन रुपये आठ पैसे आणि डिझेल एक रुपया 44 पैसे इतक्या किमतीने कमी झालेले आहे. सरकारी तिजोरीवर सुमारे पंचवीस कोटी रुपयांचा भार पडणार असून सध्याच्या परिस्थितीत झालेली किरकोळ कपात ही देखील नागरिकांसाठी दिलासादायक आहे.

केंद्र सरकारने कर कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात बिगर भाजपशासित राज्यांमध्ये राज्य सरकारांनी कर कमी करावा यासाठी दबाव वाढू लागला होता त्यातूनच राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. भाजपच्या नेत्यांनी यासाठी राज्य सरकारांवर मोठा दबाव आणायला सुरू केले होते त्यानंतर काहीसे नमते घेत राज्य सरकारने नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.


शेअर करा