मी नेहमीच तुमच्यासोबत पण ‘ हे ‘ योग्य नाही : रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून त्यांना मानणारा एक मोठा तरुण वर्ग देखील आहे . अशाच काही तरुणांनी मिळून रोहित पवार यांच्या नावाने एक एक अराजकीय संघटना स्थापन करण्यात आल्याचे वृत्त आले होते. सदर बातमी रोहित पवार यांच्यापर्यंत पोहचली असता त्यांनी एक ट्विट करून हे वागणे योग्य नसल्याचे सांगितले आहे .

आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, ” माझ्यावर प्रेम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या नावे अराजकीय संघटना सुरू केल्याचं समजलं. या सर्वांना माझी विनंती आहे की,मी #NCP चा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नाही. त्याऐवजी आपण एकत्रितपणे सामाजिक काम करत राहू. कार्यकर्ता म्हणून मीही नेहमीच तुमच्यासोबत राहील

मी राष्ट्रवादीचा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नाही. त्याऐवजी आपण एकत्रितपणे सामाजिक काम करत राहू. कार्यकर्ता म्हणून मीही नेहमीच तुमच्यासोबत राहील, अशा शब्दात आमदारांनी उत्साही कार्यकर्त्यांना प्रेमाचा सल्ला दिलेला आहे. मंगळवारी (1 सप्टेंबर) ट्विटरवरून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

‘रोहित पवार युवा ब्रिगेड’ या नावाने ही अराजकीय संघटना स्थापन केल्याची माहिती आहे. रोहित पवार यांची कोणतीही परवानगी न घेता ही संघटना स्थापन करण्यात आली असून या संघटनेनं कार्यही सुरू केलं आहे. मात्र याबाबत जेव्हा रोहित पवार यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नसल्याचं म्हणत कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचे आमदार असल्याची जाणीव करून दिली आहे.


शेअर करा