प्रेयसीचे लग्न होताच प्रियकर तिच्या पतीला म्हणाला ‘ बस गाडीवर ‘ अन … ?

शेअर करा

लग्नानंतर अवघ्या चार दिवसांच्या आतच नववधूच्या आधीच्या प्रियकराने पतीचा काटा काढल्याची घटना परभणी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील वझुर बु. येथील लहू रामा साठे (वय २२) या युवकाचा लग्नानंतर चौथ्या दिवशी खून झाला. पत्नीच्या प्रियकराने हा खून केल्याचे समोर आले असून पोलिसांनी यासाठी आकाश बाळासाहेब मस्के ( राहणार गडदे वाडी तालुका परळी ) याला अटक केली आहे.

वझुर बु.येथील लघु रामा साठे याचा विवाह 28 सप्टेंबर रोजी लोणी, तालुका परळी येथील मुली सोबत झाला होता मात्र लग्नानंतर चौथ्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबरला लघु बेपत्ता झाला. त्याचे वडील रामा साठे यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद देखील पोलिसात दाखल केली. 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता आकाश हा वझुर येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी आकाशची माहिती घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 3 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजता अंबाजोगाई येथून आकाशत ताब्यात घेऊन मानवत येथे आणले.

पोलीस तपासादरम्यान आकाशने खुनाची दिली असून पोलिसांना घटनास्थळी येऊन लहूचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दाखवला.लग्न झालेल्या मुलीचे दोन वर्षापासून आकाश सोबत प्रेमसंबंध होते. प्रेयसीचे लग्न झाले हा राग मनात धरून आकाश मस्के याने लहू साठे यांचा खून केला. 2 ऑक्टोबर रोजी लघु आणि आकाश एका मोटरसायकलवरून गावाबाहेर गेले होते. त्यानंतर प्रेमसंबंधावरून एका शेतामध्ये त्या दोघांमध्ये झटापट झाली त्यात आकाशने कोयत्याने वार करून लहूचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.


शेअर करा