तुझ्यासाठी मी बायकोला सोडले आहे अन तू ? : भर रस्त्यात प्रियकराने प्रेयसीची केली धुलाई

  • by

‘ तुझ्यासाठी मी बायकोला सोडले आहे. तू आता लग्नाला का नकार देत आहेस? असं विचारत एका विवाहित तरुणाने प्रेयसीला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. प्रेयसीला मारहाण करणाऱ्या प्रियकराला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजित कनोजिया असं या प्रियकराचे नाव आहे. Here in Kalyan, the lover beat his girlfriend in the street

उपलब्ध माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात राहणारी तरुणी ही कल्याण पश्चिमेतील सर्योदय मॉलमध्ये कामाला आहे. ही तरुणी आपले काम आटोपून मॉलच्या खाली आली असता हा तरुण तिची वाट पाहतच उभा होता. काही काळ बोलणे झाल्यानंतर त्याने हुज्जत घालायला सुरु केली अन नंतर तिला भर रस्त्यात मारहाण सुरु केली. काही नागरीकांनी या तरुणाला पकडले मात्र हाताला हिसका देऊन तो फरार झाला.तरुणाचे नाव अजित कनोजिया असून काही वर्षापासून त्याचे या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.

अजित हा विवाहित आहे. विवाहित असताना या तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध सुरु होते. दहा दिवसापूर्वी आपल्या या प्रेयसीसाठी आपल्या पत्नीला सोडले होते. पत्नीला सोडल्यानंतर या तरुणीला वारंवार लग्नासाठी गळ घालत होता मात्र तरुणीने अखेरच्या क्षणी त्याला लग्नासाठी नकार दिला. मात्र तरीही अजित प्रेयसीचा लग्नासाठी होकार मिळवण्याचा प्रयत्न करत होता.

अजित त्याची प्रेयसी काम करत असलेल्या मॉलखाली आला आणि त्याने तिला सांगितले की, तुझ्यासाठी बायकोला सोडले आहे. तू आता लग्नाला का नकार देत आहे? . अजितच्या प्रश्नावर दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. या वादातून अजितने प्रेयसीला मारहाण केली. याप्रकरणी तरुणीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि अवघ्या 2 तासाच पोलिसांनी आरोपीला अटक केली .