काही वर्षांपूर्वी बिहारच्या भागलपुर येथील एका प्रेमी युगुलाची जोरदार चर्चा झाली होती. हिंदीचे प्राध्यापक असलेले मटुकनाथ यांचे त्यांची शिक्षिका त्यांची विद्यार्थिनी असलेली जुली हिच्यासोबत प्रेमसंबंध सुरू झाले आणि त्यानंतर तत्कालीन विविध वृत्तवाहिन्यांमध्ये देखील ते चांगलेच चर्चेत आलेले होते. सोशल मीडियावर देखील त्यांना लव गुरु असे म्हटले जाते. त्यांच्या वयात मोठे अंतर असून जुली ही अखेर मटुकनाथ यांना सोडून वेस्टइंडीज इथे स्थायिक झालेली आहे.
लवगुरु असलेले मटुकनाथ आणि त्यांची विद्यार्थिनी जुली हे रिलेशनशिपमध्ये राहत होते . मटुकनाथ यांच्या पत्नीने त्यांना रंग हात पकडले आणि त्यानंतर याचा व्हिडिओ देखील त्यावेळी सोशल मीडियात जोरदार व्हायरल झालेला होता . काही संघटनांनी मटुकनाथ आणि त्यांचे प्रेयसी यांच्यावर काळी शाई देखील ओतलेली होती. प्रेयसीने आपल्याला सोडलेले असले तरी आपण तिच्या प्रेमाला मनात जिवंत ठेवलेले आहे असे मटुकनाथ यांचे म्हणणे आहे.
मटुकनाथ म्हणाले की , ‘ मी माझ्या प्रेमाला जिवंत ठेवलेले आहे. जुलीची नेहमी मला आठवण येते. लग्न करा किंवा करू नका मात्र प्रेम नक्की करायला हवे . लग्न हे बळजबरीचे बंधन आहे आणि प्रेम हे स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. मी एकटा राहत नाही मी निसर्गाशी प्रेम करतो जेव्हा कधी मला जुलीची आठवण येते त्यावेळी मी निसर्गात मन रमवतो. मला देखील आता एकटे राहण्याची देखील सवय झालेली आहे ,’ असेही ते पुढे म्हणाले.
2004 मध्ये पाटणा विद्यालयात मटुकनाथ आणि जुली यांच्या प्रेमाची कहाणी सुरू झालेली होती जुली हिनेदेखील त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मग मटुकनाथ यांचे विचार आणि त्यांच्या त्यांचा प्रामाणिकपणा मला आवडलेला आहे असे म्हटलेले होते . मटुकनाथ यांच्या पत्नीने त्यांना रंगेहाथ पकडले आणि त्यानंतर त्यांना बेदम मारहाण देखील केलेली होती.
जुली तुम्हाला का सोडून गेली यावर बोलताना मटुकनाथ यांनी तिला उच्च सुख सुविधांचा आनंद मिळवायचा होता तिला असे वाटत होते की याच्याही पुढे जाऊन आपण पुन्हा प्रेम करू शकतो म्हणून 2014 मध्ये जुली हिने मटुकनाथ यांना सोडलेले असून ती सध्या वेस्टइंडीज मध्ये एकटी राहत आहे. तिची तब्येत बिघडल्यानंतर मी सुद्धा तिला वेस्टइंडीजला जाऊन भेटलेलो आहे आणि चार महिने तिच्यासोबत राहिलो मात्र ती भारतात परतण्यास तयार नाही जर ती भारतात परतली तर तिला पुन्हा नक्कीच स्वीकारेल असे मटुकनाथ यांनी म्हटलेले आहे.