बाळूमामांच्या मेंढ्या गावात आल्या म्हणून महाप्रसाद , अडीच हजार भाविकांना विषबाधा

शेअर करा

महाराष्ट्रात एक दुर्दैवी अशी घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात कोष्टवाडी येथे समोर आलेली असून बाळूमामांच्या मेंढ्या गावात आलेल्या असताना गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले मात्र भगरीसोबत शेंगदाणे आणि आलूची कढी खाल्ल्यामुळे सुमारे अडीच हजार भाविकांना विषबाधा झालेली आहे. 

बाळूमामाच्या पालखीचा प्रसाद घेऊन रात्री एकच्या सुमारास अनेक जण घरी परतले त्यावेळी त्यांना चक्कर येणे , उलट्या येणे , अंगात थरथर होणे असे प्रकार सुरू झाले. सावरगाव , फुलेवाडी , करेवाडी , मुरंबी , माळाकोळी गावातील नागरिकांना त्रास होऊ लागल्यानंतर मिळेल त्या वाहनाने उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे त्यांना ऍडमिट करण्यात आले. 

रुग्णालयाची बेड क्षमता इतकी मोठी नसल्या कारणाने पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाची देखील मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. काही जणांवर नांदेड येथील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेले असून एकाच वेळी इतके लोक आल्यानंतर रुग्णालयातील आरोग्यवस्थेवर देखील मोठ्या प्रमाणात ताण आलेला होता . व्हरांड्यातच नागरिकांना सलाईन लावण्याची वेळ आली आणि सलाईन लटकवण्यासाठी स्टॅन्ड नसल्याकारणाने नातेवाईकांना हातात सलायन घेऊन बसण्याची वेळ आली. 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धार्मिक उत्सवाच्या दरम्यान भावनेच्या भरात कुठलीही अघटीत घटना होणार नाही या भावनेतून नागरिक या उपक्रमात सहभागी होतात मात्र भावनेच्या भरात स्वतःच्या आयुष्याशी खेळून अशा दुर्दैवी घटना या आधी देखील झालेल्या आहेत. 


शेअर करा