बेरोजगार होताच पहिल्या बायकोला अंधारात ठेवून ऐष आरामासाठी केले ‘ दुसरे लग्न ‘ मात्र अचानक एकदा….

शेअर करा

कंपनीत एकत्र काम करत असताना झालेल्या परिचयाचा फायदा घेऊन नागपुरातील एका बेरोजगार तरुणांने मुंबईतील प्राध्यापक तरुणीसोबत दुसरे लग्न करून तिची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नागपूर कोतवाली पोलिसांनी प्राध्यापिकेचे फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. Unemployed youth from Nagpur cheated on his first wife and got married for the second time

कमलेश अशोक राऊत ( वय ३३ राहणार विश्वकर्मा नगर गल्ली नंबर 10 अजनी ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कमलेश आणि पीडित 35 वर्षीय पारुल ( बदललेले नाव ) एका कंपनीत काम करत होते. पारुल तेथे अधिकारी होती तर कमलेश ड्रायव्हर होता. त्यानंतर मुंबईच्या एका महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी लागल्यामुळे पारुल मुंबईला गेली आणि दरम्यान कमलेश बेरोजगार झाला.

कौटुंबिक कारणामुळे तिचा पतीसोबत घटस्फोट झाला आणि ती एकटीच मुंबईत राहत होती. कमलेश याला ही माहिती कळताच आणि ती उत्तम पैसे कमवत असल्याचे कमलेश याला समजताच त्याने तिला फसवण्याची योजना तयार केली त्याने पारुलची भेट घेऊन आपण विद्युत विभागात कर्मचारी असल्याचे सांगितले तसेच तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

पारुल स्वतः घटस्फोटित असल्यामुळे आणि कमलेश देखील अविवाहित असल्याने तिने झटकन लग्नासाठी होकार दिला आणि त्यांनी जून 2019 मध्ये जगनाडे चौकातील गायत्री मंदिरात लग्न केले. त्यानंतर दोघेही मुंबईला गेले. पुढे कमलेशने संपत्ती खरेदी करण्याच्या नावाखाली पारुल हिच्याकडून सहा लाख 67 हजार रुपये घेतले आणि त्यातून तो ऐशआराम करू लागला.

लॉकडाऊन घोषित झाल्याने पारुल हिचे कॉलेज बंद झाले आणि ती नागपूरला आई-वडिलांकडे आली. कमलेश देखील नागपूरला आला आणि मुंबईला जाण्याचे कारण सांगून एक लाख 95 हजारचे दागिने घेऊन तो निघून गेला. काही दिवसानंतर पारूल हिला कमलेशच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आले त्यामुळे तिने कमलेश याच्या मित्राला फोन करून माहिती घेतली असता कमलेश मुंबई येथे नसून नागपूर परिसरातच असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर ती सतर्क झाली आणि कमलेश यांच्या घरी गेल्यानंतर तिने त्याला पत्नीसोबत रंगेहाथ पकडले. पहिल्या पत्नीने देखील तो फक्त ऐश आरामाचा शौकिन असल्याचे पारुल हिला सांगितले त्यानंतर पारुल हिने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.


शेअर करा