‘ ती ‘ त्याच्या प्रेमात झाली होती पूर्ण आंधळी मात्र त्याने घेतला असा काही फायदा की ..? : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमीयुगुलांनी मस्त फिरण्यास सुरुवात केली. फोनवरील संभाषण वाढले. भेटीगाठी वाढल्या अशातच युवकाने युवतीला लग्नाचे आमिष दाखवले. युवतीने त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवत सर्वस्वी वाहून दिले. त्यांचे प्रेम शारीरिक संबंध ठेवण्यापर्यंत पोहोचले. मात्र दरम्यान युवतीला आईची आठवण आली आणि ती आईला भेटायला आली, मात्र शारीरिक संबंधात अडथळा आल्याने युवकाचे पित्त खवळले आणि त्याने तिला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला. बातमी यवतमाळ जिल्ह्यातील असून आरोपी सुरज मुसळे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

सदर युवती आपल्या प्रेमात पूर्णपणे बुडालेली आहे हे सुरजच्या लक्षात आले होते त्यानुसार त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवयाला सुरु केले. प्रेमात बुडालेल्या युवतीने सूरजच्या बोलण्यावर विश्‍वास केला. सूरज आपल्याशी लग्न करणार असल्यामुळे ती आनंदी होती मात्र कारणे देत त्याने तिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा प्रस्ताव ठेवला. आज नाही उद्या लग्न करणारच असल्यामुळे युवतीने देखील सहज होकार दिला.

सुरजबरोबर सदर युवती पळून आली आणि दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दरम्यान, दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. लिव्ह इनमध्ये राहत असल्याने शारीरिक संबंध रोजचीच गोष्ट झाली होती. एकेदिवशी युवतीला आईची आठवण आली. यामुळे ती सूरजला न सांगला निघून गेली. यामुळे चिडलेल्या सूरजने तिला वीष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. युवतीच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

युवतीला आईच्या घरी गेल्याचा जाब विचारत ठार मारण्याचा उद्देशाने तिच्या अंगावर बसून काळ्या लिक्वीडच्या बिषाची बॉटल तिच्या तोंडात ओतली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीने वणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून संशयित सूरज मुसळे याच्याविरुद्घ विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला असून पुढे तपास सुरु आहे .

संबंधित बातम्या

भाडेकरू म्हणून आली अन मालकीण बनली पण तरीदेखील होता पैशांचा हव्यास : उचलले धक्कादायक पाऊल
https://nagarchaufer.com/?p=198

लॉकडाऊनमुळे भावी पतीचा विरह सहन होत नसल्याने नवरीने पायी गाठले भावी पतीचे घर : पुढे काय झाले ?
https://nagarchaufer.com/?p=80

एका मुलीची आई अविवाहित युवकाच्या प्रेमात, नवरा सोडून धरला प्रियकर मात्र ? : महाराष्ट्रातील बातमी
https://nagarchaufer.com/?p=239

लग्न झाल्यावर चारच दिवसात नववधू गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघड : महाराष्ट्रातील बातमी
https://nagarchaufer.com/?p=264

मोलकरणीशी अनैतिक संबंधाकरिता आईवडील बहीण आणि बायकोलाही संपवले : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=51


शेअर करा