सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देणारा मुख्यमंत्री दुसरा कोणी नसेल, ‘ ह्या ‘ अभिनेत्याने केले उद्धव ठाकरेंचे कौतुक

शेअर करा

कोरोनाचं संकट संपायच्या आतच निसर्ग चक्रीवादळाचं संकट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर येऊन ठेपलंय. गेल्या ३ महिन्यात कोरोनाविरुद्ध महाराष्ट्र लढत असताना आता आणखी नवं संकट निसर्ग वादळाच्या निमित्ताने महाराष्ट्रावर येऊन ठाकले आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ज्या परिस्थितीत काम करत आहेत यावरून आता बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसी याने देखील उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे.

आपल्या सुरुवातीच्या कार्यकाळातच एवढ्या मोठ्या संकटांना मुख्यमंत्र्यांना तोंड द्यावं लागतंय, असे अभिनेता अर्षद वारसीने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून म्हटले आहे. आपण विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षांचा निर्णय घेतला, पण आपली परीक्षा संपत नाहीये. एकामागून एक संकट येत आहे. आता, निसर्ग चक्रीवादळाचा मोठा धोका असून अलिबागला हे वादळ येईल. त्यामुळे कुणीही पुढील दोन दिवस घराबाहेर पडायचं नाही, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला केल्या आहेत.

https://twitter.com/ArshadWarsi/status/1268021781941477376

” मला वाटत नाही, दुसऱ्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांना सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांचा सामना करावा लागला आहे. त्यांनी नुकताच आपल्या खुर्चीचा पदभार घेतला अन् जागितक महामारी असलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागला. मुंबई सारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरात कोरोना अन् आता निसर्ग चक्रीवादळाचा सामना या मुख्यमंत्र्यांना करावा लागत आहे ” अशा शब्दात अर्शद वारसी याने देखील उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे.

संबंधित बातम्या

लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रात चक्क राष्ट्रवादीच्या आमदाराचे सामूहिक नमाज : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=149

जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील ‘ ह्या ‘ मंत्र्याला कोरोनाची लागण ,मुंबईला हलवणार
https://nagarchaufer.com/?p=134

आरती कीजै नरेन्द्र ललाकी म्हणत नरेंद्र मोदींची आरती झाली लाँच…काय आहेत आरतीचे बोल ?
https://nagarchaufer.com/?p=103

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फेसबुकवर गंभीर चूक,महाराष्ट्र बचावची सगळी बनवाबनवी उघड : काय आहे प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=76

महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89

नमस्ते ट्रम्प साठी आले होते तेव्हा ‘ ते ‘ कानावर पडलं असावं : जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर हल्लाबोल
https://nagarchaufer.com/?p=302


शेअर करा