लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रात चक्क राष्ट्रवादीच्या आमदाराचे सामूहिक नमाज : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी तथा जमावबंदी आदेश प्रशासनाने जारी केले आहेत, मात्र देशात आणि राज्यात हे नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत की काय अशी देशात आणि राज्यात परिस्थिती आहे . एकीकडे भाजप नेते मनोज तिवारी यांनी लॉकडाऊन दरम्यान क्रिकेट खेळल्याचे प्रकरण ताजे असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रात राष्ट्र्रवादीचे आमदार बाबाजानी दुराणी यांनी लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करत असंख्य मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन पाथरी येथे आपल्या घरासमोरील मैदानात सोमवारी (२५ मे) नमाज अदा करून या आदेशाची पायमल्ली केली. त्यामुळे या प्रकरणाची पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आमदार दुर्रानीसह इतर तब्बल १२५ जणांवर परभणी येथील पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केला आहे

आमदार बाबाजानी दुर्राणीसह त्यांचा पुतण्या तबरेज खान रहेमान खान दुर्राणी, तारेख खान आब्दुला खान दुर्राणी, हरून मौलाना सारोलवी, शेख जमील, शेख रशीद, छडया अब्दुल रजाक, शेख मतीन कपडेवाला, मुस्तफा टेलर, शेख खयुम शेख नन्नु, अजहर शेख, फेरोज खान, रज्जाक सयद, शमीम भाई, सलीम सयद, पाशाभाई फैजु, मोईज अन्सारी यांच्यासह इतर १०० ते १२५ आरोपींचा समावेश आहे.

करोना विषाणुच्या संसर्गाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन मानवी जिवन व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल, असे कृत्य करुन संसर्ग पसरवण्याची घातक कृती केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. याशिवाय शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले. सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करण्यास मनाई असतांना घरासमोरील मोकळ्या जागेत सामुहिकरित्या नमाज पठण केले, त्यामुळे आरोपींविरुद्ध पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

संबंधित बातम्या

” तेव्हा ” काळ्या चड्ड्या बनियन घालून आंदोलन केलं असत तर महाराष्ट्राने पाठ थोपटली असती : संजय राऊत
https://nagarchaufer.com/?p=59

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या हातात ‘ फडणवीस हटाव ‘ चा फलक ? : जाणून घ्या काय आहे वस्तुस्थिती
https://nagarchaufer.com/?p=62

महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89

३१ मे नंतर लॉकडाऊन राहणार कि उठणार, काय म्हणाले उद्धव ठाकरे ? : संपूर्ण व्हिडीओ
https://nagarchaufer.com/?p=111

आरती कीजै नरेन्द्र ललाकी म्हणत नरेंद्र मोदींची आरती झाली लाँच…काय आहेत आरतीचे बोल ?
https://nagarchaufer.com/?p=103

अंकल..तुम्ही आदराच्या लायकीचेच नाही, स्वरा भास्करच्या निशाण्यावर कोण ?
https://nagarchaufer.com/?p=123

लॉकडाऊनचे नियम फाट्यावर मारत भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार खेळले क्रिकेट : व्हिडीओ व्हायरल
https://nagarchaufer.com/?p=142


शेअर करा