मायबाप बंधू भगिनींनो म्हणत निलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल , व्हिडिओत म्हटलंय की..

शेअर करा

अत्यंत साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करणार असे निलेश लंके यांच्याकडून सांगण्यात आलेले होते त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय इथे निलेश लंके यांनी अखेर उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे त्यांच्या मोजक्या कार्यकर्त्यांसोबत आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले होते.  विशाल गणपती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर निलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून विरोधी उमेदवार सुजय विखे यांच्या तुलनेत निलेश लंके यांची उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया साधीच होती. 

निलेश लंके यांच्या समर्थनार्थ मतदार संघातून अनेकजण चारचाकी आणि दुचाकी गाड्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय इथे दाखल झालेले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही अंतरावरच या गाड्या छत्रपती संभाजीनगर रोडवर लावण्यात आलेल्या होत्या.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती.उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी निलेश लंके यांनी निर्देश दिलेले होते त्यानुसार शहरात कुठेही वाहतूक व्यवस्था कोलमडलेली नव्हती तसेच कुठलेही मुख्य रस्ते बंद करण्यात आलेले नव्हते. 

निलेश लंके यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केलेला असून त्यामध्ये त्यांनी , ‘ मायबाप, बंधू भगिनींनो…मी आज मंगळवार, दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करतोय. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर दहशत करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचा विडा हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर मी उचलणार आहे.तुमच्या या लेकराला, मित्राला, भावाला आता फक्त तुमचे आशिर्वाद हवे आहेत.आपला जनसेवक.. निलेश ज्ञानदेव लंके ‘ असे म्हटलेले आहे. 


शेअर करा