कीर्ती मॅडमच्या घरात सापडलं 80 तोळे सोनं अन.. ,  महाराष्ट्रात लाचखोरी थांबेना

शेअर करा

कीर्ती धनाजी देशमुख

लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील किनी येथे समोर आलेला असून एका पूड रेस्टॉरंटवर कारवाई थांबवण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना महिला अन्नसुरक्षा अधिकारी हिला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , कीर्ती धनाजी देशमुख ( राहणार ताराबाई पार्क कोल्हापूर मूळ मोहोळ जिल्हा सोलापूर ) असे जिच्यावर कारवाई करण्यात आली त्या अधिकाऱ्याचे महिला अधिकाऱ्याचे नाव असून तिच्या घरातील झडती 80 तोळे सोने , साडेतीन लाख रुपयांची रक्कम आणि डायमंडचा हार आणि चार चाकी जप्त करण्यात आली आहे. 

15 मार्च रोजी कीर्ती मॅडम यांनी रेस्टॉरंटची तपासणी केली आणि अन्नपदार्थाचे नमुने घेतले होते.तुमच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही असे आश्वासन देत त्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती तडजोडी नंतर 70000 रुपयांवर त्यांचा व्यवहार ठरला आणि फिर्यादी व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याप्रकरणी तक्रार दिली. 

पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांनी सापळा रचला आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आपले नियमातील काम करून देण्यासाठी कोणी लाच मागत असेल तर 10 64 नंबर वर फोन करावा तक्रारदार व्यक्ती यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. 


शेअर करा