महाविकास आघाडी सरकारकडून ‘या’ सहा गोष्टींवरील निर्बंध झाले शिथील : काय आहेत त्या गोष्टी ?

शेअर करा

लॉकडाउन संपल्यानंतर राज्य सरकारने हळू हळू बंधने शिथिल करण्यास सुरुवात केली आहे . कोरोना आटोक्यात येत नसल्याने सरकार मोजून मापूनच पावले टाकत आहे . उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना राज्यातील निर्बंध ३ जूनपासून टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार राज्य सरकाकडून एक नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये खाली दिलेल्या सहा गोष्टीत सरकारने शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे . .

कोणते निर्बंध सरकारने केले आहेत शिथिल ?

  • बाहेर व्यायाम करण्याची परवानगी. मात्र यावेळी व्यायामाचं कोणतंही साहित्य, गार्डनमधील जीम, ओपन एअर जीम वापरता येणार नाही.
  • दुकान सम-विषय नियमाने पूर्ण दिवस सुरु ठेवण्याची परवानगी. एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं सुरु राहतील. नियमांचं पालन होईल यासाठी पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी मार्केट तसंच दुकानं मालक असोसिएशनला चर्चेत सहभागी करुन घ्यावे. यावेळी वाहतूक व्यवस्था आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन महत्त्वाचं.
  • खासगी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी. खासगी कार्यालयं १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल) त्यांच्यासोबत कामकाज सुरु करु शकतात. इतर कर्मचाऱ्यांना घरुन काम करावं लागेल. यावेळी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेईल. जेणेकरुन कर्मचारी घरी परतल्यानंतर ज्यांना सहजपण लागण होऊ शकते त्यातही खासकरुन वृद्धांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाईल. ८ जून २०२० पासून हा निर्णय लागू होईल.
  • रविवारपासून म्हणजेच ७ जून २०२० पासून वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी स्वच्छतेच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.
  • शैक्षणिक संस्थांचे (शाळा/कॉलेज/विद्यापीठ) कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी कामकाज सुरु ठेऊ शकतात. ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची काम करु शकतात.
  • मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी आता पासची गरज नसून कोणतेही निर्बंध नसणार आहेत. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्यांवर नियमितपणे लक्ष ठेवलं जाणार आहे. अडकलेले मजूर, स्थलांतरित कामगार, पर्यटक यांच्या प्रवासावर आधीच्या नियमांप्रमाणे नियंत्रण असणार आहे.

सरकारकडून वेळोवेळी नवीन निर्देश देण्यात येत असून त्याचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे

संबंधित बातम्या

लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रात चक्क राष्ट्रवादीच्या आमदाराचे सामूहिक नमाज : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=149

जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील ‘ ह्या ‘ मंत्र्याला कोरोनाची लागण ,मुंबईला हलवणार
https://nagarchaufer.com/?p=134

आरती कीजै नरेन्द्र ललाकी म्हणत नरेंद्र मोदींची आरती झाली लाँच…काय आहेत आरतीचे बोल ?
https://nagarchaufer.com/?p=103

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फेसबुकवर गंभीर चूक,महाराष्ट्र बचावची सगळी बनवाबनवी उघड : काय आहे प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=76

महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89

नमस्ते ट्रम्प साठी आले होते तेव्हा ‘ ते ‘ कानावर पडलं असावं : जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर हल्लाबोल
https://nagarchaufer.com/?p=302


शेअर करा