फेसबुकवरच्या मैत्रिणीच्या ‘ तसल्या ‘ जाचाला कंटाळून अखेर तरुणाची आत्महत्या

शेअर करा

सोशल मीडियाचा वापर वाढण्यास त्यावरुन मैत्री आणि विविध माध्यमांतून फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील कासारी फाटा येथील २५ वर्षीय तरुण दीपक सुभाष सांगळे याची फेसबुकवरुन एका महिलेशी मैत्री झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर महिलेने तरुणाला लग्नासाठी गळ घालत जमीन व ट्रक नावावर करण्यासाठी तगादा लावला. या जाचास वैतागून सदर तरुणाने धारुरजवळील एका शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी संबंधित महिलेसह या तरुणाच्या मित्रावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा धारुर पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे.

दीपक सांगळे हा अविवाहित होता. स्वत:च्या मालकीचा ट्रक चालवून तो कुटुंबाला हातभार लावत असे. त्याची विवाहित बहीण शीतल दिगांबर घुगे (रा. चिंचपूर ता.धारुर ) यांनी सोमवारी धारुर ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मयत दीपक याची आरती (पूर्ण नाव माहीत नाही) या पुणे स्थित विवाहित महिलेशी फेसबुवर सहा महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत आरतीने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर माझ्याशी लग्न कर,शेती व ट्रक नावची कर’ असे म्हणून तिने त्यास मानसिक त्रास देणे सुरु केले.

आरतीला मृत दीपकचा मोबाइल क्रमांक उपलब्ध करुन दिल्याने त्याचा मित्र ज्ञानेश्वर उर्फ वाघ्या बाबासाहेब मुर्गीकर (रा. धारुर) यालाही गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले. या प्रकरणात आरोपी महिलेच्या पूर्ण नावाचा उल्लेख नाही. तिची ओळख पटविण्यासाठी मयत दीपक सांगळे व त्याचा मित्र ज्ञानेश्वर मुर्गीकर या दोघांचे मोबाइल ताब्यात घेतले आहेत. त्यावरुन आरोपी महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असून अधिक तपास सुरु असल्याचे तपासी अधिकारी फौजदार प्रदीप डोलारे यांनी सांगितले.


शेअर करा