श्रीगोंदा तालुक्यातील माऊली गव्हाणे खून प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले असून नाजूक कारणातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
माऊली सतीश गव्हाणे ( वय 19 वर्ष राहणार दाणेवाडी तालुका श्रीगोंदा ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी सागर दादाभाऊ गव्हाणे ( वय वीस वर्ष राहणार दाणेवाडी तालुका श्रीगोंदा ) याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलेले असून अत्यंत क्रूरपणे माऊली गव्हाणे याचा खून करण्यात आलेला होता.
बेलवंडी पोलिसात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासाची सूत्रे सोपवली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली. आरोपी सागर गव्हाणे याने खून केल्याची कबुली दिलेली असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव , पोलीस अंमलदार बापूसाहेब फुलाने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.