पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐनवेळी कच खाल्ली , त्यांच्या पायाचं तीर्थ पिण्याची यांची.. 

शेअर करा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात ट्रम्प यांच्या मध्यस्थीने शस्त्रविराम झाल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानने आगळीक केली असून शस्त्रविराम झाल्याच्या या वृत्तावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांचं ऐकून शस्त्रविराम का केला ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी कोणत्या आधारावर केली ? भारत १४० कोटी लोकांचं महान राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आपण शस्त्रविराम करतो. काय आहे कारण? भारताला काय मिळालं? पुरा बदला लेंगे, छोडेंगे नही ही भाषा मोदींनी केली होती. पाकिस्तानचे तुकडे करणार होते त्याचं काय झालं? भारताची बेअब्रू झाली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया आली आहे की आम्ही युद्ध जिंकलो. भारताच्या पंतप्रधानांना हे शोभत नाही. कोणत्या अटी शर्थींवर शस्त्रविराम दिला? हे सर्वपक्षीय बैठकीत सांगा असं संजय राऊत म्हणाले.

पाकिस्तानला कायमची धडा शिकवण्याची संधी होती तरीही देशाच्या राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली आणि सैन्याचं तसंच देशाचं मनोबल उद्ध्वस्त केलं. कुणासाठी तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी. त्यांचा काय संबंध आहे आपल्या देशाशी? सार्वभौम राष्ट्राने हा निर्णय का घेतला? 26/11 चा हल्ला झाल्यानंतर मोदीच म्हणत होते की देशाचे पंतप्रधान ओबामांकडे जाऊन रडत आहेत. आता मोदी आणि अमित शाह ट्रम्पकडे जाऊन रडत आहेत का? सिंदूर वगैरे सगळं राजकारण आहे. २६ पर्यटकांचा बळी गेला, त्यांचा अपमान मोदींनी केला आहे. टोकाला जाऊन पोहचलो असताना अवसानघातकी निर्णय मोदींनी घेतला. कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय घेतला. हल्ल्यांमध्ये नुकसान भारताचं झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा काय संबंध? जर त्यांची मध्यस्थी जगात मानली जाते तर मग इस्रायलचं युद्ध का थांबवलं नाही? मोदींचे मित्र ट्रम्प यांनी भारताला पाठिंबा दिला नाही.

जगात भारताला मित्र नाही. मोदी २०० देश फिरून आले आहेत पण भारताचा मित्र कोण जरा त्यांनी सांगावं? भारताच्या युद्धाला पाठिंबा देणाऱ्या लोकांना पाठिंबा देणाऱ्या देशांचं नाव मोदींनी सांगावं. तटस्थ राहणं म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही. लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे. अमेरिकेच्या पापाने वॉर का थांबवलं ते सांगावं. देशाचा अपमान झाला आहे. देशाच्या भावना दुखावल्या आहेत. ज्या महिलांचं कुंकू पुसलं ते अतिरेकी कुठे आहेत? ऑपरेशन सिंदूर तेव्हाच पूर्ण झालं असतं जेव्हा या अतिरेक्यांचा खात्मा होत नाही. आज लोकांना इंदिरा गांधींची आठवण येते आहे. इंदिरा गांधीने निक्सनचा हस्तक्षेप धुडकावून लावला होता. इंदिरा गांधींनी त्यांची मध्यस्थी स्वीकारली नाही. इंदिरा गांधींनी युद्ध टोकाला नेलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले. आता नरेंद्र मोदींचा राजीनामा दिला पाहिजे कारण त्यांनी देशाचा विश्वासघात केला. अमित शाह यांनीही राजीनामा दिला आहे. २६ महिलांचा सिंदूर पुसला गेला आहे तुम्ही कसले ऑपरेशन सिंदूर करत आहात? असे खडे सवाल संजय राऊत यांनी केला.

इंदिरा गांधी आज असत्या तर पाकिस्तान राहिलाच नसता. १९७१ मध्ये त्यांनी पाकिस्तानला गुडघ्यांवर आणलं होतं. या लोकांनी काय केलं? पंडीत नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर हे सातत्याने टीका करत आहेत. त्यांच्या पायाचं तीर्थ पिण्याची या सत्ताधाऱ्यांची लायकी नाही. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


शेअर करा