राज ठाकरेंनी विचारलेल्या ‘ ह्या ‘ प्रश्नानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

शेअर करा

मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींचं टार्गेट दिलं होतं. राज्यात अनेक शहरं आहेत. त्यात अनेक पोलिस आयुक्त आहेत. त्यांना कितीचं टार्गेट देण्यात आलं? असा सवाल करतानाच या प्रकरणाचा केंद्र सरकारने तपास करावा. केंद्राने याचा तपास केल्यास राज्यात फटाक्याची माळ लागेल, असा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला नाही तर राजीनामा घ्यावा असे देखील राज ठाकरे म्हणाले आहे .

मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुखांवरच आरोप केले होते. देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटींची वसुली करण्यास सांगितलं होतं, असं सिंग यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विट करून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

” परमबीर सिंग यांना पदावरून का बदलण्यात आलं. ते त्यात ते गुंतलेले होते का? ते गुंतलेले होते असं वाटतं तर त्यांची बदली का केली, चौकशी का केली नाही?” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी शनिवारी केला होता.

या प्रकरणानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. मला जे आता बोलायचे ते बोलून झाल्यावर मी कोणत्याही प्रश्नांना उत्तर देणार नाही. ते माझ्या निवेदनात असेल. का देऊ शकणार नाही किंवा का इच्छा नाही हे पण निवेदनात असेल. कारण प्रश्न विचारल्यावर अनेक विषय निघतात आणि मूळ विषय निघून जातो. त्यामुळे इतर विषयांना मी हात घालणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला १०० कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे. अशी घटना महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या इतिहासात घडली नाही. एक वर्षे झाले म्हणून १२०० कोटी द्यायला हवी असेल पण लॉकडाऊनमुळे बारबंद होते. त्यामुळे ही वसुली झाली नसेल. राज्यात शहरं किती पोलीस कमिशनर किती त्यांना काय टार्गेट दिला हे अजून बाहेर आलं नाही. गृहमंत्र्यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

बॉम्ब अतिरेकी ठेवतात हे ऐकलं होतं, पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे ऐकलं नव्हतं किंवा पाहिलं नव्हतं. परमबीर सिंग यांना पदावरून का बदलण्यात आलं त्यात ते गुंतलेले होते का? ते गुंतलेले होते असं वाटतं तर त्यांची बदली का केली, चौकशी का केली नाही? त्यांना काढून दुसरीकडे बदली केली यातून काय साध्य होतं. तुमच्या अंगावर आलेली गोष्ट झटकून दुसऱ्याच्या खांद्यावर टाकण्याचा हा प्रकार होता, असेही राज ठाकरेंनी सांगितले.


शेअर करा