ब्लॅकमेलर लेडी डॉन प्रीती दास की बुशरा खान ? ‘ आणखी ‘ एक कारनामा आला बाहेर

शेअर करा

लेडी डॉन प्रीती दासचे एक एक कारनामे बाहेर येत असल्याने तिच्या ह्या गुन्ह्यात तिची साथ देणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहे . यात पोलीस अधिकारी, सरकारी कर्मचारी यांचा देखील समावेश आहे तर तिचे नेहमीचे मर्जीतले पंटर डुबऱ्या अमित, पत्रकार शीतल, प्राजक्‍ता बंगाली, रवी आणि शारिक ट्रेलर हे सर्व पोलिसांकडून उचलले जाण्याच्या भीतीने अंडरग्राउंड झाल्याची चर्चा नागपूर शहरात आहे.

नुकताच प्रीतीचा आणखी एक कारनामा बाहेर आला असून प्रीतीने इरफान नावाच्या एका बॉडीबिल्डर युवकाशी काही दिवसापूर्वी मैत्री केली होती.त्याला लग्नाचे आमिष दाखवून 8 लाखांनी गंडवल्याची नागपूरमध्ये चर्चा आहे . इरफानसोबत राहण्यासाठी ति स्वतःचे नाव बुशरा खान असे देखील सांगायची. त्यानंतर तिने अनेक पोलिस अधिकाऱ्यांना आणि काही तरूण पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर बदनामी करण्याची धमकी देऊन अनेकांच्या पगारातील 50 टक्‍के रक्‍कम उकळल्याची माहिती समोर आली आहे.

प्रीती दासवर सीताबर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे, पाचपावली, लकडगंज, जरीपटका आणि भंडारा जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत. प्रीती दासने गंडा घालण्यासाठी तसेच वसुली करण्यासाठी डुबऱ्या अमित, पत्रकार शीतल, प्राजक्‍ता बंगाली, रवी आणि शारीर ट्रेलर अशी ब्लॅकमेलर गॅंग बनविली होती.

प्रीती दासच्या ह्या टोळीने आतापर्यंत शेकडो धनिकांना जाळ्यात ओढले आणि खंडणी स्वरूपात लाखो रुपये उकळले. प्रीती दासची टोळी गुन्हे दाखल होईपर्यंत तिच्यासोबत होती मात्र, आता पोलिसांनी प्रीतीवर मोक्‍का लावण्याची यंत्रणेने तयारी केल्याने टोळीतील सर्व पंटर गायब झाले आहेत .


शेअर करा