‘दीदी ओ दीदी’ वरून तृणमूलच्या महिला नेत्याचा मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या की…

शेअर करा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ दरम्यान दोन टप्प्यांत मतदान पार पडलंय. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी एका जाहीर सभेत बोलताना राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना संबोधताना ‘दीदी ओ दीदी’ असा सूर लावत टोमणा हाणला होता. यानंतर सोशल मीडियावरही ‘दीदी ओ दीदी’चा ट्रेन्ड पाहायला मिळाला. ‘ममता बॅनर्जी आणखीन दुसऱ्या जागेवरूनही निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहेत का?’ असा प्रश्न विचारत अप्रत्यक्षपणे ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पडण्याचं सूतोवाचही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेत केलं होतं. मात्र, यामुळे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा चांगल्याच भडकलेल्या दिसल्या.

एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात बोलताना महुआ मोइत्रा यांनी पंतप्रधानांना प्रत्यूत्तर दिलंय. ‘बंगालमध्ये काही लोकांना रौकेर छेले असं म्हटलं जातं. रस्त्याच्या बाजुला बसून प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या महिलेला ‘दीदी ए दीदी’ म्हणणारी मुलं असा याचा अर्थ होतो… पंतप्रधानही असंच काहीतरी करताना दिसत आहेत’ असं म्हणत पंतप्रधानपदाच्या व्यक्तीला हे शोभणारं नाही, असा टोला महुआ मोइत्रा यांनी लगावला.

‘पंतप्रधान पदावरील व्यक्ती लाखो लोकांच्या उपस्थितीत भर रॅलीत एका सद्य मुख्यमंत्र्याबद्दल ‘दीदी ओ दीदी’ असा सूर लावतात. तुम्ही तरी असं बोलणार का? ते आपल्या आईसाठी असं बोलू शकतील? आपल्या बहिणीसाठी किंवा परित्यक्त पत्नीबद्दल ते असं बोलू शकतील का? हे योग्य आहे का? असे पंतप्रधान इथे येऊन आपल्याला आचार-विचार शिकवणार? पंतप्रधान एका सद्य मुख्यमंत्र्याबद्दल अत्यंत हीन दर्जाच्या सुराचा वापर करत आहेत’ असं म्हणत महुआ मोइत्रा यांनी पंतप्रधानांवर टीका केलीय.

उलुबेरियामध्ये झालेल्या एका रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन करत एक पत्र लिहिलं होतं, त्याबद्दल बोलताना ‘दीदी तुमचं कृत्य हेच दाखवत आहेत की तुम्ही नंदीग्राममधून पराभूत होत आहात… तुम्ही पराभव मान्य केलाय. दीदी ओ दीदी… अफवा कानी येत आहेत की तुम्ही आणखी एखाद्या जागेवरून अर्ज दाखल करणार आहात. हे खरं आहे का?’ असं म्हणत पंतप्रधानांनी ममता बॅनर्जी यांना टोला हाणला होता.

शेअर करा