मतिमंद मुलीची पॅंटी आईला उलटी दिसली अन त्यानंतर ..

शेअर करा

मतिमंद पणामधून आठ दिवसात बरे करतो असा बहाणा करून 22 वर्षीय तरुणीवर एका मांत्रिकाने अत्याचार केल्याची घटना बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पाच वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणी गुरुवारी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के आर पाटील यांनी आरोपीला दोषी ठरवून त्याला आठ वर्षाची सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दिलीप वामन रोकडे ( वय 57 ) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार, 23 मार्च 2016 रोजी दिलीप रोकडे याने पीडित मुलीच्या आईची वस्तीवर जाऊन भेट घेतली. त्यावेळी तुमच्या मतिमंद मुलीला फक्त आठ दिवसात मी बरे करतो, असेही तो म्हणाला. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आई दुसऱ्या दिवशी 24 मार्च 2016 ला पीडित मुलीला घेऊन त्याच्याकडे गेली.

त्यावेळी त्याने अंगावरून लिंबू कापून टाकण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला ओढ्यात नेले आणि तिथे गेल्यानंतर या नराधमाने तिच्यासोबत अत्याचार केला. पीडित आईच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात दिलीप रोकडे यांच्या विरोधात बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती त्यानंतर त्याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.

पीडित मुलगी ही मतिमंद असल्याने तिला याविषयी काहीच सांगता येत नव्हते मात्र पीडितेला घेऊन आरोपी बाहेर आला. त्यानंतर दोघी मायलेकी घरी आल्या मात्र मुलीच्या अंगातील पॅन्ट उलटी घातलेली असल्याने आईला शंका आली आणि तिने मुलीकडे चौकशी केली असता तिने आपल्या सोबत झालेल्या प्रकाराची आईकडे तक्रार केली, त्यानंतर आईने पोलिसात धाव घेतली आणि आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


शेअर करा