‘ असल्या ‘ अवस्थेत भाजपचे खासदार सांगत आहेत कोरोनावर जबरदस्त इलाज : पहा व्हिडीओ

शेअर करा

वेळ भेटेल तिथे आपला अजेंडा घुसवायचा हा भाजपचा उद्योग काही लपून राहिलेला नाही. सध्याच्या ट्रेंडिंग टॉपिकमध्ये कोरोना असल्याने कोरोनावर काहीतरी करून लोकांना काहीही सल्ले द्यायचे मग त्याला कुठला वैज्ञानिक आधार असो वा नसो. भाजपचे केंद्रीय मंत्री अर्जुन मेहवाल यांनी नुकतेच भाभीजी पापड खाऊन ‘ कोरोनाचा मुकाबला करण्याचा सल्ला दिल्यानंतर आता भाजप खासदार सुखबीरसिंह हे देखील आपल्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत .

भाजप खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून यात सुखबीरसिंह चिखलानं अंघोळ करताना करताना दिसत आहेत. कोरोनाची भीती बाळगू नका. नैसर्गिक गोष्टीपासून आपण खूप लांब राहातो. निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. चिखलानं अंघोळ केल्यानं आणि शंख वाजवल्यानं कोरोनाचा संसर्ग होणार नाही असाही अजब दावा त्यांनी केला आहे. या गोष्टी केल्यानं कोरोना तुमच्यापासून दूर राहील, असा दावा देखील भाजप खासदार सुखबीरसिंह करत आहेत .

https://twitter.com/shiv_patil100/status/1294897765982429187

सुखबीरसिंह जौनपुरिया हे राजस्थानमधील टोंक इथले भाजप खासदार आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या त्यांच्या या अजब दाव्याची सध्या सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा रंगली आहे. त्यांचा चिखलात अंघोळ करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदी जिथे कोरोनाच्या मुकाबल्यासाठी दिवे लावण्याचा सल्ला देतात तिथे भाजप खासदारांकडून वेगळी अपेक्षा काय करणार ..असल्या सल्ल्यांनी जगभरात भारताची काय शोभा होत असेल याचे देखील यांना काही घेणे देणे आहे का नाही असा प्रश्न देखील यांना पडत नसावा.

याआधी राजस्थानमधील केंद्रीय मंत्र्यांनी अर्जुन मेहवाल याची कोरोनापासून दूर राहण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता भाजप खासदार सुखबीरसिंह यांनी हा अजब दावा केला आहे. गोळ्या घेऊन रोगप्रतिकार शक्ती वाढणार नाही. त्यासाठी भरपूर खाल्लं पाहिजे, फिरलं पाहिजे, खेळलं पाहिजे, शेतात काम करायला हवं, असे देखील सुखबीरसिंह जौनपुरिया या व्हिडिओत म्हणतात . पापड खाण्याचा सल्ला दिल्यानंतर अर्जुन मेहवाल यांना देखील कोरोनाची लागण झालेली आहे आणि काँग्रेसने त्यांना इलाज म्हणून पापड पाठवले आहेत . बाबागिरी समाजात जास्तीत जास्त रुळावी या पद्धतीने हिंदू धर्माचा आधार घेऊन भाजप देशाला १०० वर्षे मागे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावरून दिसते.


शेअर करा