‘ पॉक्सो ‘ बद्दलचा तो वादग्रस्त आदेश अखेर मागे , काय होता आदेश ?

शेअर करा

लहान अल्पवयीन मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा पॉक्सो यांच्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यापूर्वी स्थानिक पोलिस उपायुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक आहे असा आदेश जारी करण्यात आला होता मात्र त्यानंतर पुन्हा घूमजाव करत हा आदेश परत घेण्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी जाहीर केले असून आता पॉक्सो अंतर्गत गुन्हे तात्काळ दाखल होतील असे सांगण्यात आलेले आहे.

खाजगी वैमनस्यातून हे गुन्हे दाखल केले जातात अशा शक्यतेने हे आदेश जारी करण्यात आले होते मात्र पोलिसांची कार्यशैली पाहिली तर पोलिसांकडून हे कलम सहजासहजी लावले जात नाही. काही प्रकरणात प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर तपास योग्य रित्या झाला नाही आणि संबंधित आरोपी जर दोषी नसेल तर त्याला नाहक मानसिक त्रास होतो असे नमूद करत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले होते मात्र लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटनांनी याविषयी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केल्यानंतर हे आदेश मागे घेण्यात आलेले आहेत.

नवीन आदेशानुसार आता पॉक्सो संदर्भात गुन्हा दाखल करते वेळी निरीक्षकांनी सहाय्यक आयुक्त तसेच पोलीस उपायुक्त यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून शहानिशा करावी आणि त्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करावा. आरोपीला अटक करण्यापूर्वी सहाय्यक आयुक्त यांचे आदेश द्यावेत आणि उपायुक्त यांनी स्वतः तपासावर देखरेख करावी असे स्पष्ट करण्यात आलेले आहे .


शेअर करा