अन्यथा महापालिकेसमोर ‘ टाळी वाजवा ‘ आंदोलन करण्याचा काजलगुरू यांचा इशारा

शेअर करा

नगर शहरातील प्रभाग क्रमांक चार परिसरात अर्थात सिंधी कॉलनी येथे राहत असलेल्या अनेक तृतीयपंथी व्यक्तींना परिसरातील मोकाट कुत्रे आणि इतरही नागरी समस्या यांचा सामना करावा लागत आहे. सदर प्रश्न तातडीने मार्गी लावावेत यासाठी संस्थेच्या अध्यक्षा काजल गुरु यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. यासंदर्भात त्यांनी एक निवेदन दिलेले आहे.

संस्थेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधी कॉलनी परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे तसेच या परिसराची वेळेवर साफसफाई देखील केली जात नाही. चेंबर देखील तुंबलेले आहे तसेच वेळेवर पाणी उपलब्ध होत नाही. लाईटची देखील गंभीर समस्या असून परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे परिसरात राहणाऱ्या करणाऱ्या अनेक नागरिकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो .

प्रभागातील नगरसेवकांना या वेळी अनेकदा यासाठी अनेकदा संपर्क केला मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आम्ही आमच्या मागण्या आपल्यासमोर मांडत आहोत. येत्या सात दिवसात समस्या सोडवल्या गेल्या नाही तर महापालिकेच्या कार्यालयाच्या समोर टाळी वाजवा आंदोलन करण्यात येईल असे म्हटले आहे यावेळी अनेक तृतीयपंथीय बांधव उपस्थित होते.


शेअर करा