‘ राष्ट्रवादीचा एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार ‘ , अमोल मिटकरी म्हणतात की..

शेअर करा

राष्ट्रवादीचा एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार आहे असे खळबळजनक ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री केले होते त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालेली असून पावसाळी अधिवेशनाच्या मुहूर्तावर विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी हे ट्विट केले गेले आहे का ? अशी देखील चर्चा यामुळे रंगलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात नबाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे. माझे शब्द जतन करून ठेवा. 2019 मध्ये परमवीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा असे मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेले होते. लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपण त्या बड्या नेत्यांचा पर्दाफाश करणार आहोत, असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणावर वक्तव्य करताना, ‘ भाजप नेते मोहित कंबोज यांनी मध्यंतरी भोंगे वाटले होते. आता ते स्वतः भाजपचा भोंगा झालेले आहेत. ईडीच्या दारात बसून कंबोज यांनी ही माहिती मिळवली आहे का किंवा त्यांनाही माहिती कुठून मिळाली याची चौकशी झाली पाहिजे. कधी कोणाच्या घरी धाड टाकणार हे ट्विट करून आणि पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते सांगणार असतील तर हे निश्चितच संशयास्पद आहे. मोहित कंबोज हे कोणाचे कार्यकर्ते आणि कोणाच्या चड्डीचा नाडा आहेत हे सर्वांना माहीत आहे, असे देखील अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.


शेअर करा