नगर हादरलं.. मतिमंद मुलीसोबत ‘ नको ते ‘ करताना नराधम रंगेहाथ धरला

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात समोर आले असून एका मतिमंद मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार आढळा इथे उघडकीला आलेला आहे. अकोले पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकलेल्या असून तपास सुरू असल्याची माहिती आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दिलीप विठ्ठल पवार असे आरोपीचे नाव आहे असून गावातील एका 36 वर्षीय मतिमंद मुलींची आई-वडील कामानिमित्त मजुरीसाठी गेलेला असताना बाहेर गेलेले असताना रविवारी दुपारी आरोपी दिलीप याने घरात घुसून आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या नातेवाईकाला याप्रकरणी माहिती समजताच त्यांनी अकोले पोलीस ठाणे गाठून आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे .

तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, 36 वर्षीय पीडित मुलगी ही मतिमंद असल्याने तिला स्वतःला बोलता येत नाही. 28 ऑगस्ट रोजी तिचे मजूर आई वडील शेतात कामावर गेले असताना घरातून तिच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून आपण तिथे धाव घेतली आणि त्यानंतर दरवाजाकडे जाऊन जोराने धक्का दिला असता आतमध्ये दिलीप विठ्ठल पवार हा मतिमंद मुलीवर अत्याचार करत असल्याचे आपले आपल्याला दिसले. आपल्याला पाहिल्यानंतर घाबरून त्याने आपले पाय पकडून माझ्याकडून चूक झाली पुन्हा असे होणार नाही म्हणत हाताला धक्का देऊन तो पळून गेला.

पीडित मुलगी झालेल्या प्रकाराने अत्यंत घाबरून गेली होती त्यामुळे तिला अकोले ग्रामीण रुग्णालयात आणून तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भुषण हंडोरे हे करीत आहेत.


शेअर करा