ज्याला अटक केली ‘ तो ‘ साधासुधा माणूस नव्हता , पोलिसही झाले हैराण

शेअर करा

देशात एक वेगळीच घटना समोर आलेली असून दिल्ली पोलिसांनी भारतातला सगळ्यात मोठा चोर आपण पकडलेला आहे असा दावा केलेला आहे. अनिल चौहान असे या चोराचे नाव असून त्याने आतापर्यंत पाच हजारापेक्षा जास्त गाड्या चोरल्या आहेत असे सांगण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने असा चौहान यास अटक केली असून त्याच्यावर कारचोरी, हत्या, आर्म एक्ट तसेच तस्करीचे देखील गुन्हे दाखल आहेत. 90 च्या दशकापासून गुन्हेगारी विश्वात हा कार्यरत आहे असे पोलिसांनी सांगितले असून त्याच्यावर 181 गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे.

अनिल चौहान हा सत्तावीस वर्षांपासून गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी 90 च्या दशकात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मारुती ८०० अशा अनेक गाड्या चोरी केलेल्या होत्या. ह्या गाड्या त्याने जम्मू-काश्मीर, नेपाळ आणि ईशान्येकडील राज्यात विकल्या. दिल्ली पोलिसांनी या आधी देखील त्याला अटक केली होती मात्र तुरुंगातून सुटताच त्याने पुन्हा एकदा आपल्या जुन्या व्यवसायात पदार्पण केले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार अनिल चौहान याने अनेक राज्यांमध्ये स्वतःची संपत्ती खरेदी केलेली असून नेपाळमध्ये देखील त्याने मोठ्या प्रमाणात संपत्तीची खरेदी केलेली आहे . आतापर्यंत त्याने तीन लग्न केलेली असून त्याला सात मुले आहेत. 1990 मध्ये तो दिल्लीच्या खानापूर भागात राहत होता आणि ऑटो रिक्षा चालवायचा त्यानंतर त्याने त्यात कुटुंबाचा चरितार्थ चालत नसल्याने गुन्हेगारी विश्वात पदार्पण केले आणि गाड्या चोरी करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्याने पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

नागालँड येथे बंदी असलेल्या संघटनांना तो उत्तर प्रदेशातून हत्यारे पोहोचवत होता. पोलिसांना त्याच्याकडे आता सहा पिस्तूल आणि दोन चोरीच्या गाड्या सापडलेल्या असून दहशतवादी कृत्यात त्यांची काय भूमिका होती याचाही पोलीस सध्या तपास करत आहेत. अनिल चौहान हा काही कालावधी पुरता आसामी इथे ठेकेदार देखील झाला होता. स्थानिक पुढाऱ्यांनी देखील त्याला याप्रकरणी मदत केली. 2020 चाली तो तुरुंगाबाहेर आला आणि पुन्हा एकदा त्याने आपला जुना धंदा सुरू केला मात्र पोलिसांनी त्याला जेरबंद केले.


शेअर करा