एमबीबीएस महिला डॉक्टरचे जडले चहावाल्यावर प्रेम , डॉक्टरने रूममध्ये बोलावले अन..

शेअर करा

लग्न करायचे म्हटल्यानंतर साधारणपणे आपल्या तोलामोलाचा आणि ज्याच्यासोबत आपण सुखाने राहू शकू अशा व्यक्तीचा विचार केला जातो मात्र पाकिस्तानमध्ये कराची इथे एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून एमबीबीएस असलेल्या एका महिला डॉक्टरने चहावाल्या व्यक्तीसोबत लग्न केलेले आहे. प्रेम खरे असेल तर पैशाची गरज नाही. पैसा आज नाहीतर उद्या येईल मात्र प्रेम पुन्हा मिळणार नाही, असे म्हणत या महिला डॉक्टरने आपल्या विवाहाचे समर्थन देखील केले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, डॉक्टर किश्वर आणि चहावाला शहजाद यांचे हे प्रकरण असून त्यांची ही आगळीवेगळी स्टोरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. दिपालपूर येथील हे प्रेमीयुगुल असून मेरा पाकिस्तान या यूट्यूब चैनलवर त्यांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या प्रेमाची गजब कहाणी सांगितलेली आहे.

डॉक्टर किश्वर रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होती अन तिथे शहजाद हा चहावाला चहा घेऊन यायचा. तिथे आल्यानंतर ज्यावेळी लोक चहा पीत असायचे त्यावेळी तो तिथे साफसफाईचे काम करायचा आणि जायचा. एके दिवशी डॉक्टर किश्वर यांनी त्याला त्याचा मोबाईल नंबर मागितला आणि त्यानंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले. व्हाट्सअपच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात राहायला लागले आणि एके दिवशी महिला डॉक्टर यांनी त्याला प्रपोज केले.

महिला डॉक्टर यांनी त्याला आपल्या रूममध्ये बोलावले आणि त्यानंतर त्याला ‘ माझे तुझ्यावर प्रेम आहे माझ्याशी लग्न करशील का ‘ असा प्रश्न विचारला. अचानकपणे हा प्रश्न समोर आल्यावर काय बोलावे हेच त्याला कळत नव्हते कारण तो त्यावेळी आजारी होता मात्र डॉक्टर त्याला देखील मनातून आवडायच्या त्यामुळे त्याने जास्त विचार न करता हो म्हटले आणि त्यांचे लग्न पार पडले.

महिला डॉक्टर यांनी आपल्या नवऱ्याचे तोंड भरून कौतुक करताना आपण त्याच्याकडे कधी चहावाला किंवा साफसफाईवाला म्हणून पाहिलेच नाही त्याच्या सगळ्या वर्तणुकीवर मी फिदा झाले असे म्हटलेले आहे तर शहजाद याने डॉक्टर मला मनातून खूप आवडत होत्या मात्र त्या कधी आपल्या प्रेमात पडतील आणि आपल्याशी लग्न करतील असा विचारही मी केलेला नव्हता असे म्हटलेले आहे. लग्न केल्यानंतर त्यानंतर त्यांचा खरा संघर्ष सुरू झाला. त्यांचे हे लग्न अनेकांच्या पचनी पडले नाही आणि त्यानंतर डॉक्टर यांना रुग्णालयातली नोकरी सोडावी लागली त्यानंतर त्या स्वतःचे क्लिनिक खोलण्याचा विचार करत असून सोशल मीडियावर अनेकजणांनी त्यांना यासाठी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत.


शेअर करा