‘ तुझा कि माझा ? ‘, भर रस्त्यात दोन तरुणींची झिंज्या उपटून मारामारी , पहा व्हिडीओ

शेअर करा

सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून यामध्ये दोन मुलींचा बॉयफ्रेंड एकच आढळून आल्याने त्यांच्या जोरदार मारहाण सुरू झाली अन दरम्यानच्या काळात काहीजणांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

दोन तरुणी भररस्त्यात एकमेकींसोबत भांडण करत असून यामागील कारण म्हणजे दोघींचा बॉयफ्रेंड एकच आढळून आला. भांडणात या मुलींनी सर्व मर्यादा पार करत एकमेकींचे केस ओढत आणि फुल फ्रीस्टाइल मारामारी करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून आलेले आहे. त्यांचे भांडण सोडवण्याचा काही जणांनी प्रयत्न केला मात्र त्या कुणाचेच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.

दोन्ही तरुणी एकमेकांशी भांडत असताना त्यांचा भांडणाचा आवेश पाहून अनेक जणांनी त्यांना समजावणे बंद केले आणि त्यांचा व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर टाकून दिला. काही काळ भांडण केल्यानंतर त्या शांत झाल्या. त्यांना भांडताना पाहून व्हिडिओ मधील इतर मुले मुली देखील हसत असताना दिसत असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे . नेटकरी देखील यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. बिहार येथील ही घटना असल्याचे समजते.


शेअर करा