महिला शिक्षिकेने तेरा वर्षांच्या मुलासोबत केले लग्न , सहाच दिवसात विधवा पण..

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण समोर आले असून शिक्षिका असलेल्या एका महिलेने केवळ अंधश्रद्धेतून एका अल्पवयीन मुलासोबत असा गुन्हा केला आहे की त्या गुन्ह्याला कधीच माफी दिली जाऊ शकत नाही. पंजाबमधील जालंदर येथील हे प्रकरण असून एका महिला शिक्षिकेने अवघ्या तेरा वर्षाच्या मुलासोबत जबरदस्तीने लग्न केलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर महिला ही शिक्षिका असून मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेच्या आहारी गेली होती. ती एका जादुटोणा करणार्‍या व्यक्तीच्या संपर्कात आली आणि त्याने तिला तुमच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात मात्र त्यासाठी तुम्हाला एका अल्पवयीन मुलासोबत लग्न करावे लागेल असे सांगितले. महिलेला मंगळ आहे त्यामुळे तिचे लग्न जुळत नव्हते म्हणून मंगल टाळण्याच्या उद्देशाने या मांत्रिकाने तिला असा सल्ला दिला होता त्यानंतर तिने अल्पवयीन मुलाशी लग्न केले.

महिला शाळेत शिकवत होती त्यावेळी तिने वर्गातील देखण्या विद्यार्थ्याला ट्युशनचे निमित्त दाखवून घरी बोलावले आणि त्यानंतर त्याला बंदी बनवून टाकले . तब्बल सहा दिवस तिने त्याला घरी जाऊ दिले नाही याच दरम्यान मांत्रिक देखील तिथे पोहोचला आणि त्याने तिचा मंगळ दोष दूर करण्यासाठी जबरदस्तीने त्यांचे दोघांचे लग्न लावून दिले. पीडित विद्यार्थी हा गरीब परिवारातील असून शिक्षिकेने मोफत शिकवण्याचे आमिष दिल्यानंतर तो तिच्या घरी पोहोचला होता.

तब्बल सहा दिवस या शिक्षिकेने त्याला आपल्या घरात डांबून ठेवले आणि मेहंदीपासून तर हळदीपर्यंतचे सर्व विधी सहा दिवसात तिने पार पाडले. सदर प्रकारांसाठी मांत्रिक देखील तिथे उपस्थित होता. त्यानंतर या शिक्षिकेने त्याच्यासोबत मधुचंद्राचे नाटक देखील केले. महिला इतक्यावरच थांबली नाही तर लग्नानंतर सहा दिवसांनी तिने आपण जणू विधवा झालेले आहोत असे नाटक केले त्यासाठी तिने स्वतःच्या हातातील बांगड्या फोडल्या आणि आपला पती वारला आहे असा संदेश सगळ्या नातेवाईकांना पाठवला मात्र तिचे लग्न झालेले नाही याची तिच्या नातेवाईकांना कल्पना होती त्यामुळे त्यांनी तिच्या घरी पोहोचल्यानंतर झाला प्रकार त्यांच्या लक्षात आला असून या शिक्षिकेला ताब्यात घेण्यात आले आहे.


शेअर करा