‘ संस्कृती ‘ लॉजवर भेटायला आली आणि पिस्तूल घेऊन गेली

शेअर करा

सोशल मीडियावर झालेली मैत्री ही अनेकदा फसवणुकीच्या मार्गाने घेऊन जाते असाच एक प्रकार सध्या कल्याण येथे समोर आलेले असून फेसबुकवर मैत्री झालेल्या एका महिलेने डोंबिवली येथील एका व्यक्तीला चांगलाच चुना लावलेला आहे. सदर व्यक्ती ही हॉटेलच्या रूममध्ये शौचालयात गेलेली असताना या मैत्रिणीने सोन्याचे दागिने, परवाना असलेले रिव्हॉल्वर आणि लाखोची रोकड घेऊन तिथून पळ काढलेला आहे.

डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडवरील हॉटेल कोहिनूर येथे हा प्रकार घडला असून तक्रारदार व्यक्ती असलेले महेश पाटील यांनी संस्कृती नावाच्या महिलेच्या विरोधात डोंबिवलीमधील मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेची सीसीटीवी फुटेजच्या माध्यमातून ओळख पटवून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार सदर आरोपी महिला संस्कृती हिने महेश पाटील यांना फेसबुक अकाउंटवर रिक्वेस्ट पाठवली होती त्यानंतर त्यांनी तिची रिक्वेस्ट स्वीकारली आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये संभाषण सुरू झाले. महेश पाटील यांनी महिलेला कोहिनूर हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलावले होते मात्र तिथे आल्यानंतर त्यांनी रूम बुक केली आणि तिथे मद्यप्राशन केले.

महेश पाटील यांनी रात्री साडेअकरा वाजता लघुशंका आली म्हणून ते बाथरूममध्ये गेले असताना संस्कृती नावाच्या महिलेने त्यांचा परवाना असलेले पिस्तूल, महागडा मोबाईल, घड्याळ आणि सोन्याचे दागिने घेऊन तिथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महेश पाटील यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली आणि आरोपी महिलेवर गुन्हा दाखल केला .


शेअर करा