लिव्ह इन रिलेशनशिप ब्रेकअप करणाऱ्या तरुणीला अद्दल घडवावी म्हणून त्याने केले ‘ असे काही ‘ ?

शेअर करा

लिव्ह इन रिलेशनशिप आजकाल समाजात सहज स्वीकारले जात नसेल तर त्या पाठीमागे काही कारणे देखील आहेत . लिव्ह इन रिलेशनशिप मुळे घडलेली अशीच एक धक्कादायक घटना ठाणे इथे उघडकीस आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेल्या तरुण-तरुणीचे संबंध बिघडले आणि आणि तिने त्याच्याबरोबरचे संबंध तोडून टाकले. मात्र यानंतर संतापलेल्या तरुणाने तीस वर्षीय पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना घडली. पीडित तरुणीने ठाणे जिल्ह्यातील नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन तरुणाच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील परिसरात राहणाऱ्या तरुणीची आरोपी देवेंद्र सिंह याच्यासोबत ओळख होती. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. आरोपी देवेंद्र यांनी याने पीडित तरुणीचे 28 डिसेंबर 2019 ते 10 सप्टेंबर 2020 पर्यंत त्याच्या मोबाईल मध्ये वैयक्तिक फोटोंचे टिक टॉक व्हिडिओ बनवले तसेच हे व्हिडिओ पीडित तरुणीला व तिच्या नातेवाईकांना पाठवून तिच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट तयार केले तसेच दुसऱ्या मोबाईल नंबरवर व्हाट्सअप डीपीवर अश्लील फोटो लावून तिची बदनामी केली.

सदर प्रकरणाबद्दल तक्रार आल्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये तसेच आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघे ओळखीचे असून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नेमके हे व्हिडिओ कोणी बनवले याचा शोध सुरू असून याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांनी सांगितले


शेअर करा