क्वारंटाईन रूममधून रात्री येऊ लागले चित्रविचित्र आवाज, आत डोकावले तर बसला धक्का : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

कोरोना प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमधून बरेचसे युवक रोजगार हिरावला गेल्यामुळे पुन्हा आपल्या आपल्या गावी परतत आहेत मात्र ते मुळातच संक्रमित क्षेत्रातून आल्यामुळे त्यांना गावात आल्या आल्याच क्वारंटाईन केले जात असल्याचे चित्र आहे . मात्र काही महाभाग ह्या परिस्थितीत देखील आपल्या जुन्या सवयी सोडायला तयार नाहीत. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात बरडकिन्ही या गावात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमधून रात्री अचानक जोरजोरात खिदळल्याचे आणि मस्ती केल्याचे आणि तोडफोडीचे आवाज येऊ लागले. शेवटी काही जणांनी कोरोनाची भीती असताना देखील , थोडी रिस्क घेऊन आत पाहिले असताना त्यामागील सत्य परिस्थिती बाहेर आली.

बरडकिन्ही येथील अनेक युवक कामानिमित्त पुणे व मुंबई येथे राहत होते. तीन दिवसांपूर्वी बरडकिन्ही येथे पोहोचले मात्र त्यांचे आल्या आल्या गावातील जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण करण्यात आले. ज्या दिवशी विलीगीकरण केले त्याच सायंकाळी या युवकांनी पार्टीचा बेत आखला गावातील एका व्यक्तीने त्यांच्यासाठी चिकनची व्यवस्था केलीच सोबत दारूचीही सोय केली. झिंग चढल्यानंतर या युवकांनी विलगीकरण असलेल्या शाळेतील सामानांची नासधूस केली. रात्री पार्टी रंगात आली असताना वाढलेल्या आवाजाने हा प्रकार उघडकीस आला.

बाहेरून आलेल्या नागरिकांचे गावात पोहोचल्यानंतर संस्थात्मक विलगीकरण करणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागात अशा लोकांना ठेवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचा उपयोग केला जात आहे. याच इमारतीत चक्क चिकन आणि सोबत दारूची पाटी झाल्याची घटना उजेडात आली. पडद्याआड सुरू असलेल्या हा प्रकार तोडफोडीच्या आवाजाने गावकऱ्यांना समजला. परंतु, ते कोरोनाच्या भीतीने तिथे जाऊ शकले नाही. शेवटी प्रशासनाला याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी तहसीलदार आणि पोलिस तिथे पोहोचले. त्यांना युवकांना चांगलीच समज दिली.

जिल्ह्यात मागील पाच वर्षांपासून दारूबंदी आहे. त्यानंतरही मोठ्या प्रमाणात दारू येथे पोहोचत होती. टाळेबंदीत आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक बंद आहे. तेव्हापासून दारूची तस्करी थंडावली होती. जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहे. चोवीस तास पोलिसांचा पहारा आहे. तरीदेखील ब्रह्मपुरी तालुक्‍यातील बरडकिन्ही सारख्या आडवळणाच्या गावात दारू आली कुठून ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याचे उत्तर मात्र प्रशासन देऊ शकले नाही

संबंधित बातम्या

प्रेयसीला भेटण्याच्या ओढीने लॉकडाऊन तोडून रात्री घरातून निघाला मात्र पुढे जे घडले ये अकल्पित ?
https://nagarchaufer.com/?p=184

लॉकडाऊनदरम्यान सर्रास सुरु होते मसाज पार्लर,पोलिसी कारवाईत आठजण रंगेहाथ धरले : कुठली बातमी ?
https://nagarchaufer.com/?p=56

मोलकरणीशी अनैतिक संबंधाकरिता आईवडील बहीण आणि बायकोलाही संपवले : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=51

अनैतिक संबंधातून कोरोनावर लस म्हणून पूर्ण कुटुंबाला फसवून दिले विष : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=20

लॉकडाऊनमुळे भावी पतीचा विरह सहन होत नसल्याने नवरीने पायी गाठले भावी पतीचे घर : पुढे काय झाले ?
https://nagarchaufer.com/?p=80

फक्त इनर वेअर घालून कोरोनाच्या उपचारात गुंतलेल्या एका नर्सचा फोटो तुम्हाला आलाय काय ? : सत्यपरिस्थिती काय ?
https://nagarchaufer.com/?p=131

बलात्कार करून तब्बल सात वर्षे देत होता पोलिसांना गुंगारा, मात्र ‘ ह्या ‘ चुकीने आला पोलिसांच्या जाळ्यात
https://nagarchaufer.com/?p=146

भाडेकरू म्हणून आली अन मालकीण बनली पण तरीदेखील होता पैशांचा हव्यास : उचलले धक्कादायक पाऊल
https://nagarchaufer.com/?p=198


शेअर करा